​१०० हेक्टर  पर्यंतच्या जलाशयावरील मत्स्य व्यवसाय संस्थेवर मार्फत चालविण्यात येणारी ठेका रकमेमध्ये झालेली दरवाढ मागे घेण्याबाबत आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिले निवेदन.

0
727
Google search engine
Google search engine

मुंबई : महाराष्ट्र शासनाने दि. ३० जुन २०१७ ला शासन निर्गमित केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे तलावाच्या ठेका रकमेमध्ये जुन्या ठेका रकमेपेक्षा ६ पट वाढ केली आहे. मत्स्य व्यवसायाकरिता या अगोदर शासनाची ठेका रक्कम प्रती हेक्टर ३०० रु. दराप्रमाणे होती. मात्र दि. ३० जुन २०१७ च्या निर्णयाप्रमाणे ६ पट वाढ करण्यात आली. या कारणाने प्रती हेक्टर ३०० रु. ऐवजी १८०० रु.  वाढ झालेली आहे. त्यामुळे लहान मत्स्य व्यावसायिकाना व्यवसाय करणे  शक्य होत नाही.
          विदर्भातील मासे मारी सहकारी संस्थे मार्फत चालविल्या जाणाऱ्या लहान तलावावर मासेमारी करण्याकरिता जाणारे मच्छिमार परिस्थितीने अतिशय गरीब आणि होतकरू असून त्यांना त्या तलावावर जेमतेम रोजीरोटी मिळावा इतका रोजगार प्राप्त होतो. मासेमारी करणा-यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २५ ते ३० हजार रुपये मोठ्या मेहनती नंतर प्राप्त होते. साधारणतः तलावामध्ये बारमाही पाणी असल्याने त्या तलावाचे जल क्षेत्र मोठे असून त्या तलावात मत्स्यांची वाढ हि प्रचंड प्रमाणत होत असते. आणि लहान तलावाचे जल क्षेत्र  कमी असल्यामुळे त्या तलावात मासे वाढण्यास मुभा मिळत नाही. तसेच सर्वच आकाराचे मासे मत्स्य व्यवसाय करणा-यांना पकडावे लागते. सोबतच लहान तलाव पावसाच्या पाण्याने लवकर भरतात व ओव्हर फ्लो होतात त्या कारणाने तलावातील लहान मोठे मासे पाण्याच्या प्रवाहात वाहून मोठ्या तलावात त्यांचे आपोआप संचयन होते.
संपूर्ण महाराष्ट्रात  २३७७ मासेमारी सहकारी संस्था असून अंदाजे यावर ५९ हजार ४२५ कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात परंतु लहान तलावाच्या ठेका रकमेत दरवाढ झाल्याने सर्वच मच्छीमार यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या संदर्भात मा. मुख्यमंत्री महोदयांनी, मा. मंत्री पशु संवर्धन यांना तातडीने स्वतः लक्ष घालावे असे निर्देश दिलेले आहेत.