महाराष्ट्र राज्य किसान सभा च्या वतीने शेतकरी कर्जमाफी करिता रास्ता रोको आंदोलन 

0
561
Google search engine
Google search engine

नेर पिंगळाई –

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची संपूर्ण अंबलबजावणी,सरसकट जून २०१७ पर्यंत संपूर्ण कर्जमाफी,शेतकरी/शेतमजूर करिता पेन्शन कायदा करा,शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करा,शेतमालाला योग्य भाव द्या,वाण्याप्रण्यांचा बंदोबस्त करून वन्य प्राण्यापासून झालेल्या शेतमालाची त्वरित नुसन भारपाई द्या ह्या व इतर मागण्याकरिता आज बुधवार दि २६ जुलै २०१७ रोजी सकाळी ९ वाजता बाजार चौक येथे मागण्याकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात राहुल मंगळे तालुका सचिव किसान सभा,संजय सुने अध्यक्ष कसान सभा,विलास खाजबागे सरपंच ग्रामपंचायत नेरपिंगळाई, प्रकाश नवले शाखा सचिव भा क प ,प्रकाश कुर्हेकर व्यापारी संघटना,निलेश मंगळे सचिव किसान सभा,प्रल्हाद डहाके,अनिल डहाके,गोपाल श्रीखंडे,उल्हास श्रीखंडे,सुभाष ढवळे,संजय बेहरे,दिवाकर भोपळे,घनश्याम होले,मनोहर डहाके,माणिकराव धुर्वे,प्रमोद पाचघरे,उत्तमराव चिमोटे,बाबाराव बानाईत यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.आंदोलनानंतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.