​मातोश्री अन्नपूर्णा शेतकरी गट यांनी केले झुणका भाकर केंद्राचे उदघाटन 

0
542
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार –

ब्रा थडी येथील अंगणवाडी मध्ये मातोश्री गट कडून गणवेश वाटप

 

 

शेतकरी हा देशाचा राजा आहे तो जगेल तरच देश जगेल आणि त्याचा विचार समाजातील सर्व घटकांनी केला पाहिजे असे जिल्हा परिषद माजी सभापती आरोग्य आणि शिक्षण मनोहर राव सुने यांनी काढले.

आज दिनांक 31 जुलै ला सकाळी 10 च्या सुमारास ब्रा थडी येथील ड्रा बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शेतकरी यांच्या साठी अल्प श्या दरात झुणका भाकर केंद्र सुरू केले आहे.शेतकरी असो की मजूर वर्ग हा कधी काळी कामावर जात असताना उपाशी जातो तसे होऊ नये आणि त्यांना घरच्या जेवणाचा आस्वाद मिळावा याकरिता मातोश्री अन्नपूर्णा गटातर्फे आज झुणका भाकर केंद्र सुरुवात करण्यात आले आहे.20 रुपये प्रति नग अशी असल्याचे मातोश्री बहुद्देशीय गटाचे संस्थापक धीरज सातपुते यांनी सांगितले.
*तसेच स्थानिक ब्रा थडी येथील अंगणवाडीला भेट देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांना एकूण 10 शाळेच्या गणवेश वाटप करण्यात आले आणि मान्यवर यांनी अंगणवाडी बाबतच्या समस्या हि अंगणवाडी सेविका यांच्या कडून जाऊन घेतल्या.*
यावेळी जिल्हा परिषद आरोग्य आणि शिक्षण माजी सभापती मनोहर राव सुने,सामाजिक जेष्ठ कार्यकर्ट्रे बाबू भाऊ इनामदार,मातोश्री अन्नपूर्णा गटाचे अध्यक्ष सुरेश राव सातपुते,सचिव आशिष औत कर ,आणि संस्थापक धीरज सातपुते,अमोल निमकर, चक्रधर पेटे,अतुल दारोकर, विलास खाजोने पत्रकार,सतीश वसूल,देवेन्द्र सिसत, राहुल मोहोड,आशिष दाभाडे,जिशन इनामदार उपस्थित होते.
दोन्ही फोटो मेल केले आहे.