जगन्नाथराव व मंगेशच्या प्रामाणिकपणामुळे मिळाले हरविलेले पॉकेट – भोयर परीवाराकडुन दोघांचेही करण्यात आले कौतुक

0
510
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान )-
अनेक शहरात मौल्यवान वस्तूंसह पॉकेट चोरी होण्याच्या घटना ताज्या असतांनाच सोनगाव येथील दोन व्यक्तींनी सापडलेले पैशाचे पॉकेट परत करून अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे दाखवून दिले आहे.
स्थानिक जुना सरकारी दवाखाना परीसरात राहणारे नंदुभाऊ भोयर हे सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान शहरातील हिवसे चाय कैन्टींगवर बसले असतांना मागच्या खिशातुन त्यांचे पैशाचे पॉकेट पडले. हे हरविलेले पॉकेट काही वेळानंतरच कैन्टींगवर आलेले तालुक्यातील सोनगाव येथील शेतकरी जगन्नाथराव चावके व त्यांच्यासोबत असलेला मंगेश कोकाटे या विद्यार्थाला सापडले. त्या पॉकेटमध्ये रोख १२ हजार रूपयांसह पैन कार्ड, कोरा चेक, आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स असे महत्वाचे कागदपत्रे सुध्दा होते. आधार कार्डवरील पत्ता पाहुन दोघांनीही नंदुभाऊ भोयर यांच्या घरी जाऊन त्यांना त्यांचे पॉकेट पैसे व सर्व कागदपत्रांसह सुपुर्द केले. हरविलेली पॉकेट परत मिळताच जगन्नाथराव चावके व मंगेश कोकाटे यांच्या  प्रामाणिकपणाचे नंदुभाऊ भोयर व परीवाराकडुन कौतुक करण्यात आले. दोघांनी दाखविलेली प्रामाणिकता हे त्यांचे मोठेपण असून समाजाने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हे यावरून दिसून येते.