सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घ्या -सिध्दार्थ गायकवाड <<><>> सामाजिक न्याय विभागाच्या योजनावर आधारित चित्ररथ

0
620
Google search engine
Google search engine
 
भंडारा – 
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे. तसेच आपली आर्थिक व सामाजिक उन्नती साधावी, असे आवाहन जात पडताळणी समितीचे उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रसार प्रसिध्दी चित्ररथाला त्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मदन खडसे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते,समाजिक न्याय विभागाचे प्रमोद गणविर, अधिक्षक एन.एस. शिंदे, पराग वासनीकर, मंगेश बांडेबुचे, श्री. मुधोळकर, मरापे, पिपरेवार तसेच विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, अत्याचारास बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व जमाती कुटूंबातील सदस्यांना अर्थसहाय्य, मागसवर्गीय मुलामुलींची वसतीगृहे, स्पर्धा परिक्षा पुर्व प्रशिक्षण, बचत गटांसाठी मिनी टॅक्टर योजना, कन्यादान योजना, मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, सैनिक व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण्, भारत सरकार शिष्यवृत्ती, शासकीय निवासी आश्रमशाळा अशा विविध योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ गरजुंनी मोठया प्रमाणात घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
हा चित्ररथ सामाजिक न्याय भवनाच्या परिसरातून निघून जिल्हयात सर्वत्र फिरणार आहे. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती नागरिकांना आपल्या गावातच मिळणार आहे. तसेच फिल्म डिव्हिजनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तयार केलेला लघुपट या चित्ररथासोबत दाखविण्यात येणार आहे. यासोबतच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिंगल व चित्रफितीद्वारे माहिती देण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.