जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचा कर्मचा-यांशी दिलखुलास संवाद

0
466
Google search engine
Google search engine

अमरावती – जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज कार्यालयातील प्रत्येक शाखेत जाऊन तेथील कर्मचा-यांशी दिलखुलास संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अत्यंत अनौपचारिक व खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या भेट व संवादामुळे कर्मचा-यांमध्येही उत्साह संचारला.

 

महसूलदिनाचे निमित्त साधून आज जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक, महसूल, पुनर्वसन यासह सर्वच शाखांना भेट दिली. या भेटीत जिल्हाधिका-यांनी स्वत: प्रत्येक टेबलवर जाऊन अधिकारी व कर्मचा-यांची आपुलकीने विचारपूस केली. कर्मचा-यांना कामात येणा-या अडचणी, आवश्यक बाबी याविषयी त्यांनी यावेळी जाणून घेतले. त्यांनी सुविधा केंद्रात जाऊन तेथील कामाचीही पाहणी केली.
कर्मचा-यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. कार्यालयात स्वच्छता ठेवावी, प्रत्येकाने ओळखपत्र लावावे, आदी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.