स्वागत कक्षाव्यतिरिक्त इतर विभागात नाकारला जातोय प्रवेश-  दुर्गम भागातील नागरिक, लोकप्रतिनिधी त्रस्त

0
594
Google search engine
Google search engine

अधिकारी हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तत्परतेने सोडवणारे हवेत

रंगय्या रेपाकवार/ अहेरी: –

 


राज्यात ‘ग्लोरी आॅफ फाॅरेस्ट’ म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली येथील उपवनसंरक्षक कार्यालयात कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असून कार्यालयात स्वागत कक्षात आल्यानंतर तिथूनच कामे करा व परत जा, असा अजब फतवा काढण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

उपवनसंरक्षक कार्यालयात येत असलेले नागरिक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व इतरांना कक्षात आल्यानंतर स्वागत कक्षात नोंदणी करण्यास सांगितले जाते. या कक्षामध्ये वनमजूर सुनिल पेंपकवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाव नोंदविल्यानंतर सबंधित विभागाच्या लिपीक अथवा अधिकार्याकडे जायचे असल्यास वनमजूर सुनील पेंपकवार हे आत जाण्यास परवानगी नसल्याचे सांगतात. सबंधित विभागाच्या लिपीकास स्वागत कक्षातच बोलावून नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जात असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. स्वागत कक्षामध्ये नाव नोंदणीबाबत दर्शनी ठिकाणी फलकसुध्दा लावण्यात आलेला नाही.

उपवनसंरक्षक कार्यालयामध्ये स्वागत कक्षात केवळ बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेेली आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुध्दा व्यवस्था करण्यात आलेली नाही. बाहेरून आलेल्या नागरिकांना शौचालय , स्वच्छतागृहाचा वापर करण्याससुध्दा मनाई असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अनेकांना या कार्यालयात अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचेही कार्यालयात कामकाजानिमित्त आलेल्या नागरिकांनी सांगितले.

उपवनसंरक्षक  गिन्नी सिंह यांना भेटण्याची वेळ केवळ ३ ते ६ अशी ठेवण्यात आली आहे. तसा फलकसुध्दा त्यांच्या कक्षासमोर लावण्यात आला आहे. मात्र दुर्गम भागातील नागरिकांना भेटण  कठीण झाले आहे