मुगलसराय रेल्वेस्थानकाच्या नामांतराला केंद्र सरकारची अनुमती

0
640
Google search engine
Google search engine

नवी देहली – उत्तरप्रदेशातील मुगलसराय रेल्वेस्थानकाचे नामांतर करण्याला केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. आता याला जनसंघाचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश सरकारने ही मागणी केली होती. या नामांतराला राज्यसभेत विरोधी पक्षांनी विरोध केला. समाजवादी पक्षाचे नेते खासदार नरेश अग्रवाल म्हणाले की, सरकार उत्तरप्रदेशचा भूगोल पालटण्याचा प्रयत्न करत आहे. (आक्रमणकर्त्यांचे नाव असणारी प्रत्येक वस्तू, स्थान आदींची नावे पालटली गेली पाहिजेत. तत्कालीन काँग्रेस शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, ही चूक विद्यमान शासन सुधारत आहे, ही देशासाठी चांगली गोेष्ट आहे ! – संपादक)

१९६८ मध्ये या रेल्वे स्थानकावर दीनदयाल उपाध्याय यांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचे नाव या रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी उत्तरप्रदेश सरकारने केली होती. या स्थानकात आशियातील सर्वात मोठे यार्ड आहे. तसेच देशातील सर्वात जुन्या स्थानकांपैकी ते एक आहे.