सर्वानी चिनी बनावटीच्या वस्तूवर बहिष्कार टाका अधिवक्ता पवार यांचे आवाहन ; विद्यार्थीनिनी केला संकल्प

0
545
Google search engine
Google search engine
धामनगाव रेल्वे / मंगेश भुजबळ :-
 
चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्या शिवाय सिमावर्ती भागातील चीनची दंडेली कमी होणार नाही, त्यामुळे नागरीकांनी चीनी बनावटीच्या वस्तूंचा वापर टाळावा, व्यवसायिकांनी चिनी वस्तू बाजारात विक्रीसाठी ठेऊ नयेत असे आवाहन राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे तालुकाध्यक्ष अधिवक्ता योगेशजी पवार यांनी केले
    स्थानिक स्व .नंदलाल लोया कन्या वीध्यालय व श्रीराम कनिष्ट महाविद्यालयात स्वदेशी सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी  प्राचार्य  अर्चना ताई राऊत, माजी सैनिक कैप्टन महाजन, गजाननराव पवार  गोपालभाऊ भैया, श्रीकांतजी  पर्बत यांची उपस्थिति होती
       चीनी बनवटींच्या वस्तुवर बहिष्कार टाकून या मोहिमेत सहभागी व्हावे 
गणेशोत्सवा दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणात चीनी बनावटीच्या वस्तू दाखल होतात. कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने नागरीक या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. यात प्रामुख्याने शोभेच्या वस्तू, दिव्यांच्या माळा, विवीध प्रकारचे लाईट्स, सजावटींच्या सामानांचा समावेष असतो. नागरीकांनी या वस्तूंचा वापर टाळावा आणि चीनी बनावटीच्या मालाची खरेदी थांबवावी असे आवाहन अधिवक्ता योगेश पवार यांनी  यावेळी केले. व्यापाऱ्यांनी देखील चीनी बनावटीच्या वस्तुंची आयात थांबवावी आणि देशी बनावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन त्यांनी  यावेळी केले.
  संचालन हेमंत देशमुख ,
प्रास्ताविक सौ अर्चनाताई राऊत
आभार प्रदर्शन व् संकल्प वाचन गोपाल भाऊ भैया यांनी केले एक हजार विद्यार्थीनी चीनी बनावटीच्या वस्तु वापरणार नाही असा संकल्प केला