राज्य माहिती व जनसंपर्क संघटनेच्या (सिप्रा) उपाध्यक्षपदी दयानंद कांबळे यांची सर्वानुमते निवड

0
506
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली-

 

महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची आज दिल्लीस्थित राज्य माहिती व जनसंपर्क संघटनेच्या (सिप्रा) उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
येथील सरदार पटेल मार्गस्थित छत्तीसगड भवनात आज सिप्राच्या सर्वधारण बैठकीत कार्यकारणीची निवड करण्यात आली. मध्यप्रदेश परिचय केंद्राचे सहसंचालक संजय सक्सेना यांची कार्यकारणीच्या अध्यक्षपदी तर महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक नलीन चव्हाण यांची कार्यकारणीच्या महासचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सिप्रा ही संघटना दिल्लीत जवळपास १५ वर्षांपासून कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांना राष्ट्रीय स्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांकडून शासनातील प्रभावी जनसंपर्कासाठी वापरण्यात येणारे विविध माध्यम यावर चर्चा करण्यात येते. विविध राज्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव व विचारांची देवान-घेवान करणे आदी काम सिप्रा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते.
सिप्राच्या सर्वसाधारण बैठकीत छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिमबंगाल, ‍बिहार आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे दिल्लीस्थित अधिकारी उपस्थित होते.