सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन स्विकारेपर्यंत सुविधा केंद्र सुरू राहतील – सहकार मंत्री श्री सुभाष देशमुख

0
611
Google search engine
Google search engine

कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्रावर पैसे देऊ नये

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये एकुण 26 हजार केंद्रावर अर्ज भरण्यात येत असून  त्यात आपले सरकार केंद्र, नागरीक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र  आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे. सदरचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून होईपर्यत ही केंद्र सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांनी सुविधा केंद्रावर एकाच वेळी गर्दी करू नये,आणि अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्रावर पैसे देऊ नयेत असे अवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

देशमुख म्हणाले की,दिनांक 5 ऑगस्ट 2017  पर्यंत पीक विमा ऑनलाईन भरण्याची अंतीम तारीख असल्यामुळे पीक विमा अर्ज प्राधान्याने भरण्यात येत होते. मात्र या आठवड्यापासून संबंधीत केंद्र चालकांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज प्राधान्याने भरून घेण्याबाबत सूचना  देण्यात आल्या आहेत. संबंधीत केंद्रचालकांना फॉर्म भरुन देण्याची सुविधा शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जर  अर्ज भरण्यासाठी काही तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, जिल्हा कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार करावी आणि शेतकऱ्यांकडून कर्जमाफी अर्जासाठी सुविधा केंद्रावर पैसे  घेण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई करणयात येईल,असेही देशमुख यांनी सांगितले आहे. संबंधित केंद्र चालकाला अर्ज भरुन घेण्याच्या कार्यपद्धती बाबत सविस्तर सूचना शासनाकडून वेळो वेळी देण्यात येत आहेत काही केंद्रांवर बायोमेट्रीक मशीन काम करीत नसल्याबाबतच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत त्यांच्या अडचणी लवकरच दुर करण्यात येतील.तसेच सदर योजने अंतर्गत अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी शेतकरी बांधवांना उपलब्ध करुन देण्यात येईल व एकही पात्र लाभार्थी सदर योजनेतून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येइल असेही देशमुख यांनी सांगितले आहे.