​संस्कार ज्ञानपीठ खामगाव चा अभिनव उपक्रम- महिला पालकांनी बांधल्या- महिला शिक्षकांना राख्या 

0
928
Google search engine
Google search engine

खामगाव :- समीर देशमुख- 

आज खामगाव येथे एक पवित्र बंधनाचा  कार्यक्रम करण्यात आला बहिण भावाचं नात जपणार बंधन म्हणजेच ‘रक्षा बंधन’

या कार्यक्रमा मध्ये महिला पालकांनी महिला शिक्षकांना राखी बांधून शिक्षकांच्या प्रति विश्वास आणि  आधार मुलांची देखरेख व योग्य प्रकारे शिक्षण,संस्कार खऱ्या-खोट्याची जाणीव करून देत या नात्याची “संस्कार ज्ञानपीठ खामगाव” येथे महिला शिक्षकांना राखी बांधून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त  केली.  यावेळी येथील शिक्षकांनी भावुक होऊन आम्हाला आज खूप आनंद होत आहे कारण आज पर्यंत आम्ही आमच्या भावांना राखी बांधत आलो पण आज आम्हाला महिला पालकांनी  राखी बांधली आमच्या प्रति ही समाजात  कृतज्ञता आहे असे आम्हला वाटते या वेळी सौ. फुंडकर यांनी या कार्यक्रमाची मन भरून  स्तुती केली व  आव्हान केले की असे विविध कार्यक्रम मधून आपली संस्कृती व समाजा प्रति मान सन्मान राहील संस्थेचे प्राध्यापक धर्माधिकारी सर यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कमी होणारा कल चिंता व्यक्त  करत शिक्षकांची संख्या वाढावी संपूर्ण भारत वर्षा मध्ये शिक्षकांच्या प्रथा आदर निर्माण व्हावा अशी क्रांती घडवून आणली पाहिजे अशी आशा व्याक्त केली जेणे करून समृद्ध व संस्कृत भारताचा निर्माण होईल अशी आशा व्यक्त करतो.  यावेळी शाळेतील विध्यर्थ्यांनी स्वतःहून वेग वेगळ्या प्रकारच्या सुंदर राख्या बनवून आणल्या होत्या त्यांची प्रदर्शनी लावली होती.