नगर परिषद सेवानिवृत्त कर्मचार्यांना मिळाला दिलासा सहाव्या वेतन आयोगातील थकित ६५ टक्के रक्कम मिळाली

0
638
Google search engine
Google search engine

१० वर्षाच्या संघर्षाला यश

चांदूर रेल्वे /शहेजाद खान –

शासनाने १ जानेवारी २००६ पासुन सहावा वेतन आयोग लागु केला.चांदूर रेल्वे नगर परिषद
सेवानिवृत्त कर्मचारीयाना  २००९ पासून सहाव्या वेतन आयोगनुसार पेंशन मिळते. परंतु मागील
३९ महिण्याची पेंशनमधील फरकाची रक्कम मागील १० वर्षापासून थकित होती. त्या
रक्कमेसाठी सेवानिवृत्तांनी नगर परिषद प्रशासनाचे उंबरठे झिजविले.शेवटी लोकायुक्ताचे दार
ठोठावले होते. या वयोवृध्द सेवानिवृत्तांना थकित रक्कम मिळावी यासाठी नगराध्यक्ष निलेश
सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, नगरसेवक संजय मोटवानी सह सर्व नगसेवकांनी
मुख्याधीकार्याकडे यशस्वी शिष्टाई केली.त्यामूळे सेवानिवृत्तांना थकित ६५ टक्के रक्कम
त्वरीत मिळाल्याने दिलासा मिळाला.
चांदूर रेल्वे नगरपालीकेने १/०१/२००६ पासुन सहावा वेतन आयोग लागु केला.परंतु चांदूर
रेल्वे नगरपालीकेतून सेवानिवृत्तांना १/०४/२००९ पासुन सहावा वेतन आयोगानुसार पेंशन
मिळते. परंतु १/०१/२००६ ते ३१/०३/२००९ पर्यंतच्या ३९ महिण्यांचे ९ लाख ३५ हजार
११९ रूपये पेंशन थकबाकी मिळालेली नाही. त्यासाठी सेवानिवृत्ताचे मागील १० वर्षापासून
न.प.प्रशासनाचे उबंरठे झिजविणे सुरू होते. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली. शेवटी त्यांनी
लोकायुक्तांचे दरवाजे ठोठावले. लोकायुक्तांच्या आदेशानंतरही न.प.प्रशासनाने कारवाई केली
नाही. त्यामूळे २२ सेवानिवृत्तांनी मागण्याचे निवेदन मुख्याधिकाऱ्याना  देत त्वरीत कारवाई करा
अन्यथा महाराष्ट्र दिनी आमरण उपोषणाला बसू असा इशारा दिला होता. या सर्व गोष्टीचा
विचार करीत नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, नगरसेवक संजय मोटवानी
सह सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्याकडे ही बाब यशस्वीपणे मांडली. मुख्याधिकारी रवींद्र
पाटील यांनी योग्य निर्णय घेत १५ दिवसात या सर्व सेवानिवृत्तांच्या खात्यात ६५ टक्के रक्कम
टाकली. उर्वरीत रक्कम पेंशनधारकांना ३ महिण्यात देण्यात येणार आहे. यामूळे
सेवानिवृत्तांच्या डोळयात पाणी तरंगले. त्यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्षासह सर्व नगरसेवक,
पत्रकार मंडळीचे आभार मानले. यावेळी मनोहर मानकानी, उत्तम गावंडे, हृदेश तिवारी,
शांतीलाल कर्से, कलावती यादव, मोरेश्वर झिंगरे, बलदेव वानखडे, सुलेमानशाह रहमानशाह,
लताबाई सहारे सह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.