आ. विरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्य नेत्रदान शिबीर संपन्न – ३२२ रूग्णांची तपासणी, ६१ रूग्णांच्या मोफत नेत्रशस्त्रक्रीया होणार

0
1121
Google search engine
Google search engine

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. काळेंनी केली तपासणी

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)

शेतकऱ्यांचे कैवारी, कर्तव्यदक्ष आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्य स्थानिक ग्रामिण रूग्णालयात भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते.
सदर शिबीराचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, धामणगाव रेल्वे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष मोहन सिंघवी आदी उपस्थित होते. या शिबीरात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. राजेश काळे व सौ. काळे यांनी ३२२ रूग्णांनी तपासणी केली. यामधील ६१ रूग्णांची मोफत शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. याच दरम्यान खिचडीचे सुध्दा वाटप करण्यात आले. नेत्रिवकाराने ग्रासलेल्या रुग्णांचे मोठे प्रमाण असल्यामुळे सदर शिबीर हे दरवर्षी राबविण्यात येते.
यावेळी न.प. उपाध्यक्ष देवानंद खुणे, नगरसेवक प्रणव भेंडे, वैभव गायकवाड, सतपाल वरठे, हमीदभाई, सुजीत माकोडे, नरेंद्र मेश्राम, राजु लांजेवार, अनिल वाघ, शेख महेमुद, राजु गोयनका, गजानन खंडार, विनोद ठाकरे, नितीन राठी, संतोष मुंधडा, अमोल होले, निलेश बेलसरे, पप्पु सोळंके, संजय येंडे, आशिष कडु, भिमराव पवार, संजय उज्जैनकर, पवन बजाज, सचिन खंडार, सुरज खंडार, साजीद जानवानी, हरीभाऊ गवई, प्रविण घुईखेडकर यांसह अनेक कार्यकर्ते, हितचिंतक तसेच रूग्णांची उपस्थिती होती..