अहेरीत पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांच्या हस्ते २० हायमास्ट व LED लाईटचे लोकार्पण

0
531
Google search engine
Google search engine

अहेरी शहरात काही दिवसांपूर्वीच प्रमुख 3 चौकात हायमास्ट लाईट लागले होते तदनंतर  1 महिन्याचा आतच शहरातील प्रमुख २० चौक व कॉर्नरवर हायमास्ट लाईट व शहरातील प्रत्येक पोलवर एल.इ.डी. लाईट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे त्याचे  लोकार्पण गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांचा शुभ हस्ते पार पडले व हे २० हायमास्ट व एल.इ.डी लाईट अहेरीकरासाठी सुरू करण्यात आले आहे.

 


ह्या मुळे अहेरी शहरातील अंधाराचे साम्राज्य संपुष्टात येणार आहे , रात्री बे रात्री चालणारे दुचाकी,चारचाकी वाहनधारक तसेच सामान्य लोकांनाही मोठी सोय ह्या मुढे होणार आहे त्यामुळे सद्या अहेरीकरामद्ये आनंदाचे वातावरण आहे..
अहेरी नगर पंचायतला महाराष्ट्र शासना कडून विकास कामासाठी आलेल्या 14 व्या वित्त आयोग व नागरोत्यांन ह्या निधीतून 1 कोटी 20 लक्ष रुपये खर्चून हा उपक्रम पूर्ण करण्यात आला आहे..
यावेळी अहेरीचे नगराध्यक्ष प्राजक्ताताई पेदापल्लीवर ,भाजपा अहेरी विधानसभा विस्तारक प्रकाशजी गेडाम, अहेरी नगर पंचायतचे मुख्याधीकारी डॉ. कुलभूषण रामटेके, नगर पंचायत सभापती नारायण सिडाम, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी शहराधक्ष मुकेश नामेवार, नगरसेवक गिरीश मद्देर्लावार, सचिन पेदापल्लीवार, पप्पू मद्दीवार, सरफराज आलम, गुड्डू ठाकरे, शेषराव दिवसे, रमेश समुद्रलवार, संजय दुर्वे, श्रीकांत नामनवार सह भाजपा कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.