भोर (जिल्हा पुणे) येथील पोलीस निरीक्षकांनी दहीहंडीचा फलक फाडल्याचे प्रकरण -पोलीस निरीक्षकांना सक्तीची रजा देत विभागीय चौकशी चालू

0
1196
Google search engine
Google search engine

धर्माभिमान्यांच्या आंदोलनामुळे पोलीस निरीक्षकांना सक्तीची रजा देत विभागीय चौकशी चालू

  • हिंदूंच्या देवतांची विटंबना केल्यामुळे जनक्षोभ

  • हिंदुत्वनिष्ठ युवकांचे रास्ता रोको आंदोलन

देवतांची विटंबना करणार्‍या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे लढा दिल्यास कोणाचीही हिंदु धर्माकडे वाकड्या दृष्टीने बघण्याची ताकद होणार नाही.

भोर– येथील जवाहर तरुण मंडळाने दहीहंडी उत्सवाचे फलक नगरपालिकेची रीतसर कायदेशीर अनुमती घेऊन लावले होते. फलकांवर श्री गणपति आणि श्रीकृष्ण यांची चित्रे होती. हा फलक भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांनी १३ ऑगस्टच्या रात्री १.३० वाजता फाडला. या कृत्यामुळे देवतांची विटंबना होऊन हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या. शहरातील मंडळांचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ युवक अशा ३ सहस्र जणांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यासमोर १४ ऑगस्टला ४ घंटे रस्ता बंद आंदोलन केले अन् निदर्शनांद्वारे निषेध व्यक्त केला. तणावाचे वातावरण आणि हिंदुत्वनिष्ठांचा दबाव यांमुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी खोत यांना सक्तीच्या रजेवर पाठवून विभागीय चौकशीचे आदेश दिले, तसेच त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक हाके यांची नेमणूक केली.

आंदोलनासाठी जमलेले हिंदू

१. फलक फाडले जात असतांना मंडळातील काही कार्यकर्त्यांनी पाहिले. दुसर्‍या दिवशी मंडळातील सभासदांनी त्याविषयी पोलीस ठाण्यात विचारणा केली. त्यावर खोत यांनी मी स्वतः फलक फाडला आहे. तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्ही पुन्हा कितीही वेळा फलक लावला, तरीही मी तो फाडणारच, असे उद्दामपणे सांगितले.  खोत यांची वरील वक्तव्ये कार्यकर्त्यांनी ध्वनीमुद्रित केली होती. (खोत यांचे अन्य धर्मियांविषयी अशी वक्तव्ये करण्याचे धैर्य झाले असते का ? – संपादक)

२. खोत यांचे कृत्य समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावणारे आहे, तसेच या प्रसंगामुळे हिंदु देवतांची विटंबना झाली असल्याने त्यांच्यावर कठोर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करून कारवाई करावी, असे मागणीपर निवेदन हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सुमंत शेटे, समीर शेटे, सुधीर शेटे, अभिषेक मोरे आणि अनिकेत माने यांनी सुवेझ हक यांना दिले.

 

 

 

विशेष आभार -दैनिक सनातन प्रभात वृत्तसंकेतस्थळ