कर्नल पुरोहित यांच्या जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

0
560
Google search engine
Google search engine

नवी देहली – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीनअर्जावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट या दिवशी राखून ठेवला. पुरोहित यांच्या बाजूने अधिवक्ता हरीश साळवे यांनी न्यायालयात बाजू मांडली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) पुरोहित यांच्या जामिनाला विरोध केला आहे. ‘पुरोहित यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवावा’, असे एन्आयएचे म्हणणे आहे. एन्आयएने कर्नल पुरोहित यांच्यावरील मोक्कांतर्गत आरोप हटवले आहेत.

युक्तीवाद करतांना अधिवक्ता हरीश साळवे म्हणाले की, न्यायाच्या दृष्टीकोनातून पुरोहित यांना जामीन मिळाला पाहिजे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मिळतो, मग पुरोहित यांना का नाही ? एन्आयएची भूमिका दुटप्पी आहे.