शिवसेनेचे शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती अभियान कर्जमुक्तीसाठी करोडो पत्र मुख्यमंत्र्याला पाठविणार

0
536
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान  – 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची  कर्जमाफी करावी यासाठी राज्यात शिवसेनेचे कार्यकर्ते गर्जतो
शेतकरी ‘ मी कर्जमुक्त होणार ‘ अभियान राबवित आहे. त्यासाठी चांदूर रेल्वेत तालुका
शिवसेनेचे पदाधिकारी स्थानिक तहसील कार्यालयसमोर पेन्डाल टाकून  चांदूर शहरात येणाऱ्या
शेकडो शेतकऱ्यांचे  कर्जमुक्तीसाठीचे पत्र भरून घेत आहे. या अभियानाला शेतकऱ्यांचा
उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्याची  कर्जमाफी व्हावी यासाठी शिवसेनेच्या कार्यकत्र्यांनी कंबर
कसली आहे.त्यासाठी राज्यातील सर्व पातळीवरून शेतकऱ्यांचे  मुख्यमंत्र्याच्या नावे करोडो
पत्र पाठविणार असून यामध्ये विविध प्रश्नाचे उत्तरे हो/नाही मध्ये विचारण्यात आले आहे. हे
अभियानाला २७ मे रोजी सुरू झाले असून १९ जुन पर्यंत चालणार आहे. यामध्ये तालुक्यातून
जमा झालेले शेतकऱ्यांचे  पत्र मुख्यमंत्र्याला देण्यात येणार आहे. याकरीता चांदूर रेल्वे
तालुक्यात तहसील कार्यालयसमोर चांदूर रेल्वे तालुका प्रमुख राजेश निंबर्ते, उपतालुका प्रमुख
बंडू आंबटकर, गजानन बोबडे, स्वप्निल मानकर, हेंमत हटवार, आसिफ पठाण, शुभम डकरे,
अश्विन कपाट, राहुल निंबर्ते, मोरेश्वर राजुरकर, सनी गावंडे, गणेश गिरपुंजे, राजु चव्हाण
यांच्यासह अनेक कार्यकर्ते कामाला लागले आहे.तर संपूर्ण तालुक्यात गावपातळीवर अनेक
शिवसैनिक शेतकऱ्यांकडून पत्र भरून घेत आहे. यामध्ये शेतकरी कुटूंबात किती व्यक्ती, किती
शेती, कोणती पिके घेता, कोणत्या बँक व सोसायटीचे थकित कर्ज आहे याचा उल्लेख आहे.
या अभियानाला चांदूर तालुक्यात कालपासून सुरूवात झाली असून आतापर्यंत पाचशेच्यावर
शेतकऱ्यांनी  आपले पत्र भरून दिले आहे.

असे आहे शेतकऱ्यांचे  मुख्यमंत्र्याला पत्र


शिवसेनेच्या माध्यमातुन शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार आहे.यामध्ये शेतकरी म्हणून
आपण सुखी आहात का?, शेती शिवाय अन्य दुसरे उत्पन्न साधन आहे का?, पिक विमा योजनेचा
लाभ झाला का?, शेतीसाठी डोक्यावर कर्जाचा भार आहे का ?, कर्ज वसुलीच्या दबावामूळे
आत्महत्येचा विचार येतो का?, प्रधानमंत्रीनी केलेल्या नोटबंदीचा तुम्हाला काय फायदा झाला.
सरकारकडे मागीतलेले शेततळे मिळाले का?, ‘ मागेल त्याला कर्ज ‘या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा
लाभ झाला का ? लोडशेडींगचा त्रास सुरू आहे का?, गेल्या तीन वर्षात शेतमालाला हमीभाव
मिळाला का ?, सरकार निरूपयोगी ठरल्याची चिड मनात खदखदत आहे का?,पीक विमा
योजनेचा हप्ता कोण भरतं ? या सर्व प्रश्नाचे उत्तर विचारण्यात आले आहे.