*अचलपूर श्री जगदंब देवी संस्थान येथे रामलीला संपन्न*

0
1344
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/-

विजयादशमीच्या पर्वा वर सर्वत्र मोठ्या उत्साहाने दसरा साजरा करण्यात आला याप्रसंगी आपट्यांची पाने सोने म्हणून आप्तस्वकीयांना देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
अचलपूर येथे पुरातन व जागृत जगदंब देवी संस्थान येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.नऊ दिवस घटस्थापना करून माँ.दुर्गा व जगदंबदेवीची आराधना करण्यात आली.याप्रसंगी विविध भजनमंडळींचे भजन व कीर्तन कारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले.अष्टमी व नवमीची होमहवन करून पुजन करण्यात आले.जगदंब व्यायाम शाळेचे संचालक विजय भुजाडे यांचे मार्गदर्शनाखाली अजय भुजाडे व व्यायाम शाळेचे सर्व विद्यार्थी यांनी नऊ दिवस दांडिया गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन केले.लहान मोठ्या स्त्रिपुरूष,युवायुवतींनी यामध्ये मोठया संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.जवळपास 130 वर्षांची परंपरेनुसार स्थानीक अब्बासपुरा येथील पुरातन श्रीराम मंदिर येथे राममहाराज चुलेट यांचे मार्गदर्शनाखाली नऊ दिवस भजन व भगवान श्रीरामाची आराधना करण्यात येवुन विजयादशमीच्या निमित्ताने रामलीला सादर करण्यात आली याप्रसंगी श्रीराम मंदिर येथून राम,लक्ष्मण,सीता,हनुमान व वानरसेना यांची भव्य शोभायात्रा काढून प्रमुख मार्गाने जगदंब देवी संस्थान च्या पंटागणात पोहचली श्रीरामाची राहुल गाडगे,लक्ष्मण ची आकाश शहाणे,सीता अजय चव्हाण तर हनुमान बलराम भुसाटे यांनी भुमिका करून लंकाधीश राजा रावण यांचे सैन्यासोबत युध्द करून सीता मातेची सुटका रावणाची गोलू हेडाऊ,कुंभकर्णाची निखील उंबरकर तर इंद्रजितची दिपक बोरकर यांनी भुमिका बजावली.येथे रमाकांत शेरकार यांचे मार्गदर्शनाखाली रामायणातील सीताहरण ते रावण वधापर्यंतच्या रामलीलेचे जिवंत क्षण युध्दातून प्रेक्षकांना दाखवण्यात आले त्यानंतर दिपक माटे यांनी साकारलेल्या रावणाच्या विशाल प्रतीमेचे दहन करण्यात आले व आतीषबाजीणे विजयादशमीचा हर्षोउल्हास साजरा करण्यात आला.याप्रसंगी हजारो नागरिकांनी दुर्गा देवी व जगदंब देवीचे दर्शन घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.2 आक्टोंबर रोजी महाप्रसाद व माता जगदंबेचा जगराता असल्याचे ध्वनीक्षेपकातून घोषित करीत सुनिल रेवाळे व त्यांच्या सहकार्यांनी सुंदर रामलीलेचे विश्लेषण करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले तसेच व्यायाम शाळेचे संचालक विजय भुजाडे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुंदर तलवार बाजीचे प्रात्यक्षिक सादर केले.