*उच्च न्यायालयातुन स्थगिति मिळालेल्या 35000 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधि खाते सुरु करा*

0
681
Google search engine
Google search engine

———————————————–
*शेखर भोयर यांची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मागणी*
————————————————
*भविष्य निर्वाह निधि खाते लवकरच सुरु करण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आश्वासन*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
अमरावती :-
उच्च न्यायालयातुन स्थगिति मिळालेल्या 35000 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते पूर्ववत सुरु करा अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली असता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधि खाते लवकरच सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी गुरुवार दि.28 सप्टेम्बर रोजी सकाळी 9.00 वाजता शिक्षणमंत्री विनोदजी तावडे साहेब यांची त्यांच्या “सेवासदन” या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.यावेळी विविध शैक्षणिक विषयावर चर्चा पार पडली. यावेळी 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या इतरही उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधि खाते लागु करण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.
महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित व विना अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांची नियुक्ती १ नोव्हेंबर २००५पूर्वी झालेली होती अशा कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते उघडण्यात आले होते परन्तु महाराष्ट्र शासनाने २०१० मध्ये घाईत पत्रक काढून १ नोव्हेंबर २००५ पुर्वीच्या भविष्य निर्वाहनिधी खाते बंद केले होते .सदर शासनाच्या निर्णया विरोधात अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचाऱ्यांनि मा.उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली होती. सदर निर्णयाला मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी २०१३ मध्ये स्थगिती दिली होती.काही शिक्षकाचे भविष्य निर्वाह खाते सुरु झाले.परंतू काही शिक्षक कर्मचाऱ्यांना सन २०१५ मध्ये मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भविष्य निर्वाह खाते सुरु करण्याचे आदेश मिळवावे लागले.मा. उच्च न्यायालयाचा निर्णय येऊन सुद्धा शासनाने भविष्य निर्वाह निधी खाते सुरु केली नाहीत.
ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातुन स्थगिति मिळाली अशा 35000 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधि खाते सुरु करावे अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली असता अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधि खाते लवकरच सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.