यवतमाळमध्ये कीटकनाशाच्या विधबाधेतून शेतक-यांच्या झालेल्या मृत्यूची घटना अतिशय गंभीर- श्री धनंजय मुंडे

0
1126
Google search engine
Google search engine

यवतमाळ:-

यवतमाळमध्ये कीटकनाशाच्या विधबाधेतून शेतक-यांच्या झालेल्या मृत्यूची घटना अतिशय गंभीर, याबाबत दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, शेतक-यांच्या या हत्या असून यास कीटकनाशक उत्पादक कंपन्या, विक्रेते त्यांना पाठीशी घालणारे कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत .देवेंद्र फडणवीस विदर्भाचे असूनही त्यांनी यवतमाळला ना भेट दिली ना संवेदना व्यक्त केली. शेतक-यांचे दुःख जाणून घ्यायला त्यांना वेळ नाही का ? या घटनेतील मृत शेतक-यांच्या कुटुंबियांच्या तातडीने 10 लाख तर जखमींना 2 लाख रुपयांची मदत करावी. त्यांचे चांगल्या रुग्णालयात उपचार करावेत. यवतमाळ सारख्याच घटना नागपूर, बुलढाणा, अकोला सह अनेक जिल्ह्यात होत आहेत, हे लोण पसरत आहे सरकारने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. या घटनेतील मृत शेतकरी कुटुंबियांच्या नातेवाईकांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीने मदत करण्यात आली. तसेच या घटनेत ज्यांच्या डोळ्यांला गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे. अशी माहिती श्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे