एसटी बसच्या धडकेत वृध्द ठार – चालक अटकेत – रेल्वे स्टेशन परीसरातील घटना

0
1203
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –

 

शहरातील रेल्वे स्टेशन परीसरात एसटी बसच्या धडकेत वृध्द ठार झाल्याची घटना काल शनिवारी दुपारी घडली.
प्राप्तमाहितीनुसार, शनिवारी  चांदुर रेल्वे आगाराची एसटी बस एमएच 40 – 5104 रेल्वे स्टेशन परीसरातुन आगारात जात असतांना शिवाजी नगर परीसरात राहणारे वसंत लक्ष्मण नागणे (65) हे पायी जात असतांना त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते जागेवर गंभीर जखमी झाले असता त्यांना ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले. तेथुन त्यांना अमरावती येथील डॉ. सावदेकर यांच्या हॉस्पीटलमध्ये रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. घटनेनंतर पोलीसांनी बस चालक सतिष पवार ला अटक केली असुन पुढील तपास सुरू आहे.