चांदूर रेल्वे – ऐतिहासिक रेल्वे आंदोलनाला आज ५ वर्षे पूर्ण

0
732
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे/ शहेजाद खान –

चांदुर रेल्वे तालुका हा खेडयांनी वेडलेला आहे. मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी चांदूर रेल्वे हे एक महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. तिवसा, नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील जनतेला हे स्टेशन सोईचे आहे. असे असताना सुध्दा अनेक सुपरफास्ट रेल्वे गाडया शहरात थांबत नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची चांगलीच गोची होत असल्यामुळे रेल्वे थांब्याचा प्रश्न अखेर आंदोलन निर्णयाप्रत येऊन पोचले आणि शेवटी रोको आंदोलनाचा निर्णय घेऊन १५ ऑक्टोबर २0१२ रोजी सकाळी सहा वाजता विदर्भ एक्सप्रेस रोखुन या आंदोलनाला सुरुवात झाली होती. या आंदोलनाला आज रविवारी पाच वर्ष पूर्ण झाले आहे. पाच वर्ष पूर्ण झाले असताना सुध्दा अद्यापही मागण्या असलेल्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आलेला नाही. चांदुरवासीयांवर होत असलेल्या आण्यायाचा आज रेल रोको कृती समितीतर्फे बेशरमचे झाड रेल्वे प्रशासनाला भेट देऊन निषेध नोंदविण्यात येणार आहे.

 


माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांच्या नेतृत्वात सदर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चांदुर रेल्वे – धामणगाव मतदारसंघातील अनेक नेतेगण सहभागी झाले होते. १५ ऑक्टोबर २0१२ रोजी सकाळी ६ वाजता चांदुर रेल्वे स्टेशनजवळुन साही अंतरावर विदर्भ एक्सप्रेस २0 मिनिटेपयर्ंत रोखुन आंदोलनाची सुरुवात केली होती. दरम्यान नागरिकांचे जत्थेही आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाहेर पडले होते. ढोल-ताशांच्या निनादात सिनेमा चौकातून सकाळी ९ वाजता मोर्चा काढण्यात आला होता. सदर मोर्चा रेल्वे स्टेशन चौकात येताच पोलिसांनी तो अडवला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्याचे यांच्या कधी रेटारोटी तर शाब्दिक चकमकी सुद्धा उडत गेल्या होत्या. अशातच काही नेते मंडळी रेल्वे स्टेशनमध्ये घुसली होती आणि रेल्वेच्या अधिकार्‍यांसोबत चचेर्चा प्रयत्न केला होता. यावेळी अधिकार्‍यांकडून रेल्वे थांब्याचे आश्‍वासन मिळाले होते. त्याच दरम्यान नितीन गवळी यांच्या नेतृत्वात गोंडवाना एक्स्प्रेस थांबवली होती. तेव्हा रेल्वे स्टेशनवर एकच हलकल्लोळ माजला होता. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्ते यांच्यात वाद झाला होता. चांदुर रेल्वे स्थानकावर सराव महत्त्वाच्या रेल्वे गाडयांना थांबा देण्यात यावा ही परिसरातील प्रत्येक नागरिकांची मागणी ठरल्याने लोकांमध्येही उत्सुकता होती. या आंदोलनामध्ये हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यामध्ये शेकडो शहरवासीयांना अटक केल्यानंतर सोडून देण्यात आले होते.

 

या आंदोलनात शहरवासीयांसह विविध पक्षाचे कार्यकर्त्याचे, व्यापारी संघटना, एकता विकास मंच, वैद्यकीय संघटना, बार एसोसिएशन, ऑटो युनियन, पालेभाज्या विक्रेता संघ, विद्यार्थी संघटना, डॉक्टर्स असोसिएशन आदी विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. सदर आंदोलन हे एक ऐतहिासिक आंदोलन झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक प्रथमच शामिल झाले होते. या ऐतिहासिक आंदोलनाला आज पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अद्यापही चांदूर रेल्वे येथे महत्वाच्या रेल्वे गाडयांना थांबा देण्यात आलेला नाही.

अशा निगारगठ्ठ रेल्वे प्रशासनाचा आज रेलरोको कृती समितीतर्फे बेशरमच्या झाडाने निषेध नोंदविण्यात येणार आहे. बेशरमासारखे रेल्वे प्रशासन असल्यामुळे बेशरमचे झाड रेल्वे प्रशासनाला भेट देणार असल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. सदर आंदोलन हे रेल्वे प्रशासनाच्या ध्यानाकर्षण करीता असून आताही रेल्वे थांबा न मिळाल्यास रेलरोको कृती समिती भव्य जनआंदोलनाची तयारी करीत आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर २0१२ च्या आंदोलनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढे मात्र नक्की.