अन्नत्याग आंदोलन तुर्तास मागे – मुख्यमंत्र्यांकडून धोरण ठरविण्याकरिता सभा आयोजित करण्याचे आश्वासन

0
911
Google search engine
Google search engine

अमरावती :-

13 तारखेपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन आमदार श्री बच्चू कडू यांनी तूर्तास मागे घेतले आहे पहा आमदार श्री बच्चू कडू काय म्हणाले –

सर्व प्रहार पदाधिकारी,कार्यकर्ते यांना नम्रपणे सांगू इच्छितो की,दि.१३ अॉक्टोंबर १७ रोजी सुरू केलेल्या बेमुद्दत अन्नत्याग आंदोलन ठिकाणी प्रदूषीत पाणी पिण्यात आले.त्यामुळे माझ्या प्रकृतीने साथ दिली नाही करिता आकस्मीक उपचार घ्यावा लागला. तरी दिव्यांग,पालघर वाशी, शेतकरी, शेतमजुर यांची मी क्षमा मागतो.

मा.मुख्यमंत्री यांनी दि.२४/२५ अॉक्टोबरला आपल्या सोईनूसार संयुक्तिक विषय व राज्य शासनाचे धोरण ठरविण्याकरीता सभा आयोजित करण्याचे आश्वासीत केले आहे.तरी आपण हे अन्नत्याग आंदोलन तुर्तास मागे घेऊया.
संपूर्ण राज्यात तसेच सर्व जिल्हा, तालुक्यात सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन थांबूया.
आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपला आभारी आहे.

*आपला स्नेही,*

*बच्चु बा.कडू*