आज होणार २९४ लक्ष रुपयाच्या पालखी मार्गाचे भूमिपूजन – आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत

0
880
Google search engine
Google search engine

वरुड :-

येथून जवळच असलेल्या मुसळखेडा येथील श्री. संत यशवंत महाराज हे वरुड परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री. संत यशवंत महाराज यांच्या समाधी स्थळाला नागपूर – वरुड मार्गे चांदस ते वाठोडा वरून मंदिराकडे रस्ता जातो. या रस्त्यावरून श्री. संत यशवंत महाराजाच्या दर्शनाकरिता शेकडो भाविक भक्त पालखी यात्रा घेऊन येत असतात, राजुरा बाजार वरून निघणारी पालखी यात्रा यामध्ये विशेषताने असते. चांदस ते मुसळखेडा मार्गे वाढोडा हा संपूर्ण पालखी यात्रा मार्ग तयार करण्याचे अभिवचन मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी जनतेला दिले होते. आमदाराच्या पाठपुराव्यामुळे दि. ४ जानेवारी २०१७ रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जिल्हा स्तरीय कामांना निधी वितरण करण्याचा आदेश निर्गमित केला होता. श्री. संत यशवंत महाराज संस्था मुसळखेडा येथे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांना २९४ लक्ष रुपयांच्या कामाला सुरवात होणार आहे. बुधवार दिनांक १८ ओक्टोंबर २०१७ रोजी दुपारी ४ वाजता चांदस येथे तर दुपारी ४.३० वाजता वाठोडा येथे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर आमदार डॉ.अनिल बोंडे यांची जाहीर सभा चांदस येथील शिव मंदिर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला उद्घाटक म्हणून वरुड-मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. योगीराज महाराज राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथी मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.सौ. वसुधाताई बोंडे, वरुड नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ.स्वाती युवराज आंडे, उपाध्यक्ष किशोर भगत, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, उपाध्यक्ष धनराज अकर्ते, पंचायत समिती सदस्या सौ.अंजली तुमराम, सौ.चैताली ठाकरे, सौ.ललिता लांडगे, भाजपा तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी मार्गाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे.
यामध्ये श्री. यशवंत महाराज संस्थान, मुसळखेडा, येथे चांदस ते मुसळखेडा सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे करिता १३८.६० लक्ष तसेच श्री. यशवंत महाराज संस्थान, मुसळखेडा, येथे वाठोडा ते मुसळखेडा सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे करिता ११५.५० लक्ष व श्री. यशवंत महाराज संस्थान, मुसळखेडा, ते वाठोडा रस्त्याची सुधारणा करणे करिता ३९.९० लक्ष रुपये या सर्व रस्त्यांचा विकास होणार आहे. वरील प्राप्त झालेल्या निधीमुळे श्री. संत यशवंत महाराज समाधीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या शेकडो भाविकभक्तांची यापुढे चांगली सुविधा निर्माण होणार आहे. आ.डॉ. अनिल बोंडे या निधीबाबत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेन्द्रजी फडणवीस तथा पर्यटन मंत्री मा.ना.श्री. जयप्रकाशजी रावत, राज्यमंत्री मा.ना.श्री. मदनजी येरावार यांचे आभार मानले आहे. त्यासोबतच मतदार संघातील नागरिक व भाविकभक्तांनी आ.डॉ. अनिल बोंडे यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.पालखी यात्रा मार्गाच्या मंजुरीमुळे श्री. संत यशवंत महाराजाच्या भाविकभक्तांमध्ये आनंदाचे वातारवण निर्माण झाले आहे.
या पालखी मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी वरुड ग्रामीण तर्फे करण्यात आलेले आहे.