*तृणधान्य व तेलबिया कडधान्य नियमनमुक्त अभ्यास समितीवर आ.डॉ.अनिल बोंडे यांची नियुक्ती*

0
1182
Google search engine
Google search engine

*शासन स्तरावर सूचना व प्रतिक्रिया पाठवण्याचे आवाहन*

अमरावती : –

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) अधिनियम, १९६३ मधून तृणधान्य व कडधान्य नियमनमुक्त करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी शासनाने ११ सदस्यीय समिती गठीत केली आहे. या तृणधान्य व तेलबिया कडधान्य नियमनमुक्त अभ्यास समितीवर मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार महोदयांच्या नियुक्तीमुळे मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.डॉ.अनिल बोंडे यांचे मतदार संघासह राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी अभिनंदन केले. विकास व विनियमच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी जनतेनी शासन स्तरावर स्थापित झालेल्या समितीकडे सूचना व प्रतिक्रिया पाठवण्याचे आवाहन यावेळी आ.डॉ.अनिल बोंडे यांनी केले आहे.
यावेळी समितीच्या कार्यश्रेत्रअंतर्गत येणाऱ्या सर्व बाबीवर अडचणी निर्माण झाल्यास शेतकरी, बाजार समितीमधील व्यापारी, हमाल, मापाडी यांनी महत्वपूर्ण सूचना व प्रतिक्रिया पाठवण्याचे आवाहन मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे. तृणधान्य व तेलबिया कडधान्य यांच्या नियमनमुक्ती बाबत सूचना व प्रतिक्रिया पाठवायच्या असल्यास पुढील ई-मेल dranilbonde01@gmail.com व मोबाईल 9422156336 तसेच 9923716336 यानंबर द्याव्यात असे हि त्यांनी कळविले आहे.