अमरावती – चांदुर रेल्वे रोडवर झाले वाघोबांचे दर्शन

0
1070
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) 

 

अमरावती- चांदुर रेल्वे रोडवर अनेकवेळा रात्रीच्या वेळी वाघोबांचे दर्शन खुप लोकांना होते. मात्र आता सायंकाळीच पोहरा जंगलातील एक वाघ रस्ता ओलांडतांना शुक्रवारी एका पत्रकाराने बघितले आहे. त्यामुळे दुचाकीने सायंकाळी, रात्री प्रवास करणाऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.
शुक्रवारी पत्रकार श्रीनाथ वानखडे हे कारने परीवारासह अमरावती वरून चांदुर रेल्वेकडे येत असतांना वाघामाई मंदिराजवळ सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान रस्ता ओलांडतांना वाघोबांचे दर्शन झाले. पहिले रात्रीला रस्ता ओलांडणारे वाघ आता सायंकाळीसुध्दा रस्ता ओलांडत आहे. त्यामुळे या रस्त्याने दुचाकीने सायंकाळी, रात्री ये – जा करणाऱ्यांनी सावध राहण्याचे तसेच शक्यतो रात्रीचा दुचाकीने प्रवास टाळणे गरजेचे आहे.

 

फोटो- फाईल