हिवरखेड येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँगेसची एकहाती सत्ता !-हिवरखेड येथील मतदारांनी विरोधकांसह बीजेपी गटाचा उडविला धुव्वा !

0
1043
Google search engine
Google search engine

 

 

सरपंच पदासाठी विजय पचारे जिल्ह्यातून सर्वाधिक १५२२ मतांनी विजई !

 

रुपेश वाळके / दापोरी- /-

 

मोर्शी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या हिवरखेड ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाच्या पॅनलची सत्ता उलथावून टाकत राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या परिवर्तन प्यानलने बेजेपी व काँग्रेस गटाला जबरदस्त पराभवाचा धक्का दिला आहे. हिवरखेड ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी सरपंचपदी विजय पाचारे या तरुण युवकाला कौल देत राजकीय पक्ष व गावातील स्थानिक पॅनलमधील उमेदवारांना स्पष्टपणे धुडकावलेले दिसून येत आहे

मोर्शी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींपैकी हिवरखेड ग्रामपंचायतींची निवडनुक प्रतिष्ठेची व चुरशीची ठरलेल्या हिवरखेड ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे व सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागून होते.

हिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमधील हिवरखेड , बेलोना , उमरखेड , येथील ३ ग्राम पंचायती वर राष्ट्रवादी काँगेसने विरोधकांचा पराभव करून विद्यमान सत्ताधाऱ्यांचा चांगलाच धुव्वा उडविला आहे.

हिवरखेड येथे राष्ट्रवादी काँगेस पक्षाला सरपंच पदासाठी विजय पाचारे यांना सर्वाधिक २७३९ मते मिळून सरपंच पदासह ११ ग्राम पंचायत

सदस्य निवडून आणून एकहाती सत्ता मिळविली असून काँगेस गटाला सरपंच पदासाठी देवेंद्र गोरडे यांना १२१७ मते घेऊन पराभव स्वीकारावा लागला असून ६ ग्राम पंचायत सदस्यांवर समाधान मानावे लागले आहे.तर बेजेपी गटाला सरपंच पदासाठी निलेश शिरभाते यांना १०३८ मते घेऊन पराभव स्वीकारावा लागला असून एकही सदस्य निवडून आणता आला नसल्यामुळे त्यांना हिवरखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये चांगलाच पराभवाचा मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सर्व मतदारांमध्ये रंगत आहे .

हिवरखेड जिल्हा परिषद सर्कलमधील मतदारांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या परिवर्तन गटाला सत्ता देऊन विरोधी गटाला पराभवाची धुळ चारली. सर्कलमधील बेलोना ग्राम पंचायत सरपंच पदी गजानन वाघमारे , उमरखेड ग्राम पंचायत सरपंच पदी संजय चेर , तर हिवरखेड येथिल ग्राम पंचायत सरपंचपदी विजय पाचारे यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला मतदारांनी पसंती दिली आहे.

हिवरखेड येथील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना घराचा रस्ता दाखवून नवीन युवकांना संधी देऊन परिवर्तन घडविले असून हिवरखेड येथील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विरोधकांची चांगलीच फजिती झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी माजी शिक्षण सभापती श्रीपादराव ढोमने यांच्या नेतृत्वात परिवर्तन घडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे , उमेश गुडधे , हरिमोहन ढोमने , रामेश्वर ढोमने , गणेश धोटे , श्याम ढोमने , शरद तिडके , अनिल अमृते , योगेश धोटे , सुशांत निमकर , दिलीप पवनकर , अशोक गुळकरी , ओंकार महल्ले , अशोक राऊत , अनिल बंड , मनोहर आमले , विलास आमले , प्रल्हाद सदफळे , विनायक महल्ले , विलास पाटील , शंकर पाचारे , जमील कुरेशी , महेश उदासी , राहुल बीजवे , प्रल्हाद भोजने , यांच्यासह गावकरी मंडळींसह युवकांनी अथक परिश्रम घेतले .

 

 

 

 

विजय पाचारे नवनिर्वाचित सरपंच ग्राम पंचायत हिवरखेड

 यावर्षी थेट जनतेतून सरपंचाची निवड झाली असल्याने मतदारांनी पारंपारिक उमेदवारांना नाकारत नवीन चेहऱ्यांना विजयाचा कौल देत राजकारणाची दारे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उघडी करुन दिली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकून सर्वाधिक मतांनी मला थेट सरपंचपदी निवडून दिले , व काम करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करुन दाखविणार असल्याचे हिवरखेड येथील नवनिर्वाचित तरुण सरपंच विजय पाचारे यांनी सांगितले .