*युवा शेतमजूराचा तिव्र ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू*

0
461
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/-

अचलपूर येथील नशीबपुरा रहिवासी रविंद्र दंडाळे या युवा शेतमजूराचा तिव्र ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

अचलपूर शहरातील एक कर्तव्यनिष्ठ युवा शेतमजूर रविंद्र दंडाळे(30) राहणार नशीबपुरा हा आज पहाटे एका शेतात काम करीत असतांना त्याला तिव्र ह्रदय विकाराचा झटका आला त्याच्या सहकारी मजूर व आसपासच्या शेतकरी बांधवांनी त्याला त्वरित दवाखान्यात नेले परंतू उपचार सुरू करण्या अगोदरच रविंद्र ची प्राणज्योत मालवली व त्याला डाँक्टरांनी मृत घोषित केले.रविंद्र हा आपल्या परिवारातील आई,भाऊ व बहिणी या सर्वाचा तो कर्ता युवक होता.मजूरी करून आपल्या परिवाराचा ऊदर्निवाह करीत असतांना असंख्य सामाजिक संघटना सोबत जुडलेला असून सामाजिक कार्यात सहभागी राहायचा.शहरातील संत गाडगे महाराज तक्रार निवारण समिती,प्रहार संघटना असो की काँलेज मीत्रासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असो निस्वार्थ पणे वेळोवेळी तो सक्रीय कार्य करायचा त्याच्या मृत्यूने दंडाळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला तसेच त्याच्या मित्रपरीवारावर सुध्दा शोककळा पसरली.