सरकारी नौकरी लावुन देणारे रैकेट उघड – १५ ते २५ लाख रुपयात सरकारी नौकरी

0
1074
Google search engine
Google search engine

राज्यात 2009 पासून सुरू असलेला शासकीय भरती घोटाळा समोर आला आहे. १५ ते २५ लाख रुपये घेऊन राज्य सरकारची नोकरी लावून देण्याचे हे रॅकेट योगेश जाधव रा. मांडवी ता. किनवट जि. नांदेड  या एका धाडसी तरुणामुळे उघडकीस आले आहे.

 

आतापर्यंत या घोटाळ्याद्वारे भरती झालेल्या काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अद्याप तपास यंत्रणेने हात लावलेला नाही

युपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा हा योगेश जाधव नावाचा तरुण… या तरुणाने चिकाटीने मागील नऊ वर्ष राज्यात सुरू असलेला शासकीय भरती घोटाळा उघडकीस आणला आहे.

मात्र त्याच्यासाठी हे काम सोपे नव्हते. यासाठी मुख्यमंत्र्यांसह, अनेक वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाचे उंबरठे योगेशने झिजवले आहेत. तर तब्बल २५०० तक्रारींचे मेल योगशने या भरती घोटाळ्याप्रकरणी लिहले आहेत.

योगेशच्या या चिकाटीला आणि पाठपुराव्याला आता काही प्रमाणात यश आलं आहे. या भरती घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत भरती घोटाळ्याचे रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारासह ७ जणांना अटक झाली आहे.