चिंचवड येथे प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून

0
1305
Google search engine
Google search engine

पुणे :-

– प्रेमप्रकरणातून एका तरुणाला दगडाने जबर मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २४) रात्री घडली. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सूरज चंद्रकांत खांबे (वय 25 वर्ष रा. भुवनेश्वर कॉलनी चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचा नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सूरज खांबे व त्याच्या मैत्रिणीचे प्रेमसंबंध होते. ते दोघे दवाबाजार येथे नोकरीला होते. मात्र मैत्रिणीचे लग्न अन्य ठिकाणी जमले होते तरी ते दोघे भेटत होते.

काल रात्री दहा वाजता सुरज खांबे हा आपल्या मैत्रिणीसोबत बोलत बसला असताना पाठीमागून येऊन त्याला काही अज्ञात व्यक्तींनी दगडाने मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ YCM रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा आज मृत्यू झाला.