*23 नोव्हेंबर चा वेतनश्रेणीचा निर्णय रद्द करावा भाजपा शिक्षक आघाडीचे शिक्षण मंत्र्यांना निवेदन*

0
633
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/-

राज्यात शिक्षण क्षेत्रात वाटेल तसे निर्णय घेऊन यापूर्वीच्या सरकारने वाटोळे केले काही वर्षांपूर्वी देशात व राज्यात भाजपा व मीत्र पक्षांचे सरकार आले.सर्वांना या सरकारपासून खूप अपेक्षा विद्वान व अभ्यासू लोकांना तरी शिक्षणाचे महत्व समजेल व त्यामध्ये आमुलाग्र बदल करून ढासळलेली शिक्षण प्रणाली दुरुस्त होईल ही सर्वांना अपेक्षा.शिक्षण हा प्रगत राष्ट्राचा आधारस्तंभ आहे मताच्या राजकारणा करिता गठ्ठा मतांची संख्या पदरात पाडून घेण्याकरीता व निमुटपणे भ्रष्टाचार करून आपल्या पिढ्या सुखात ठेवण्याकरीता अशिक्षीत जनताच हवी म्हणून काही विद्वान शिक्षण प्रेमींनी शिक्षण क्षेत्राचे तिन तेरा नऊ अठरा करून टाकले.
भाजपा व मीत्र पक्षांचे सरकार आल्यामुळे हे सर्व बदलून जनतेच्या हिताचे शिक्षण प्रणाली मध्ये निर्णय घेतल्या जातील ही सर्वांना अपेक्षा.गुरू पुजनाची परंपरा असणा-या सरकारचे शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांच्या प्रगती वर शिक्षकांना वरिष्ठ किंवा निवड श्रेणी देण्याचा निर्णय घेत आहे ही कुणालाच न पटणारी गोष्ट आहे तेव्हा 23 नोव्हेंबर 2017 चा हा निर्णय रद्द करण्यात यावा तसेच सेवेची बारा वर्षे पुर्ण करणा-यास वरिष्ठ तर चोवीस वर्ष पुर्ण करणा-यास निवड श्रेणी सरसकट लागू करण्यात यावी असे निवेदन शिक्षक आघाडी भाजपा अमरावती ग्रामीण यांचे वतीने 26/10/2017 दुपारी दोन वाजता देण्यात आले याप्रसंगी घोगरे सर संयोजक, चांदूबाजार बोडखे सर ,चांदूर रेल्वे देशमुख सर,मोर्शी राऊत सर ,धारणी हेडा सर,अंजनगाव मुरकुटे सर, दर्यापूर कराळे सर ,भातकुली भडके सर ,नांदगाव पारवे सर, अचलपूर मोहड सर , धामणगाव गुलक्षेसर,वरूड खासबागैसर , अमोल ठाकरे व इतर मंडल प्रमुख उपस्थित होते.