चांदूर रेल्वे बाजार समिती दहा ते बारा व्यापाऱ्यावर अवलंबून -मोजकेच व्यापारी करतात खरेदी – नाफेड ची खरेदी ही बंद

0
642
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे  / शहेजाद खान –

– तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणीकृत केवळ दहा ते बारा च व्यापारी असून त्यातही काही मोजकेच दोन ते तीन व्यापारी घराणे बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या मालाची बोली बोलतात व खरेदी करतात. यामुळे व्यापारी बोलतील त्याच भावात शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत असल्याने शेतकरी वर्गात रोष व्यक्त होत आहे.
सध्या सणासुदीच्या काळात शेतकरी वर्गाला पैशांची गरज असते. त्यामुळे हाती आलेले पीक विकण्याची घाई शेतकरी वर्ग करतात, अशातच शासनाची सोयाबीन खरेदी विविध निकषात अडकली आहे, तर उडीद, मुंगाचे उत्पन्न तालुक्यात नाहीच. त्यामुळे सोयाबीन विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. अशात शहरातील खाजगी विक्री कधी नव्हे ती बाजार समितीने याच काळात बंद पाडली. त्यामुळे शेतकरी आपला माल घेऊन व्यापाऱ्यांच्या दारोदारी फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशात कुठेच त्यांचा माल खरेदी केल्या जात नसल्याने त्यांना बाजार समिती मध्ये आपला माल आणावा लागत आहे तर बाजार समितीत मोजकेच व्यापारी व त्यातही संगनमत करून व्यापारी माल खरेदी करीत असल्याने अतिशय अपमानकारक परिस्थितीत व अल्प किमतीत शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे. याच परिस्थितीमुळे बाजार समितीत शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद होत असून त्याचा परिणाम हाणामारीवर होत असल्याचेही चित्र आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी व सोईसाठी असलेली बाजार समिती ही खरेदीदार व्यापारी अल्प संख्येने असल्याने व त्यांच्यावरच खरेदी अवलंबून असल्यामुळे व्यापाराच्या च बाजूने आपला कल दाखवीतात त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न निर्माण होत आहे.

विविध निकषात अडकली नाफेड ची खरेदी

शासनाने अत्यंत अपमानकारक असलेला सोयाबीन चा हमीभाव आपल्या मालाला मिळवायचा असल्यास शेतकऱ्यांना विविध निकषामधून जावे लागत आहे. पहिले आपल्या मालाची ऑनलाइन नोंदणी करा, नंतर बाजार समिती तुम्हाला फोन करून माल बोलाविल्या जाईल त्यातही तुमचा माल एकदम चांगला व नाफेड च्या निकषात बसत असेल तर तो खरेदी केल्या जाईल, व त्यानंतर महिन्याभरात पैसे मिळेल.