जीवनगौरव पुरस्कार सोमाणी यांना जाहीर

0
558
Google search engine
Google search engine
महेन्द्र महाजन जैन / रिसोड –



वाशीम – सामाजीक कार्यकर्ते तथा तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश पुनमचंद सोमाणी यांना जय मल्हार शैक्षणिक व बहूउद्देशिय सामाजीक संस्था अहमदनगर यांच्या वतीने सामाजीक, धार्मिक, शैक्षणिक, दिनदलित, आदिवासी, अंध, अपंग, निराधार तसेच पत्रकारीता व वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल राज्यस्तरीय पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला असून 4 जून रोजी मान्यवरंाच्या उपस्थितीत सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, सचिव सौ. निलम जाडकर यांनी पत्राव्दारे दिली आहे.
  अहमदनगर येथील माऊली सभागृह येथे 4 जून रोजी सकाळी 11 वाजता भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते आकर्षक स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून सोमाणी यांना राज्यस्तरीय पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापुर्वी शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सोमाणी यांना गौरविण्यात आले आहे. सोमाणी यांना आजपर्यत विविध पुरस्कार प्राप्त झाले असून केंद्र शासनाचा युवा जगातील सर्वोच्च राष्ट्रीय युवा पुरस्कारही महामहिम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले आहे. सदर पुरस्कारामुळे वाशीम जिल्हयाचे नाव पुन्हा राज्यस्तरावर झळकले असून परिवर्तनाच्या चळवळीत सक्रीय राहून सामाजीक ऋण ङ्गेडण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी असल्याचे सोमाणी यांनी स्पष्ट केले.