राष्ट्रीय एकात्मता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद

0
1184
Google search engine
Google search engine

वर्धा :-

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणुन देशभर साजरा करण्यात आली. या एकता दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रिडा मैदान येथून आयोजित एकात्मता दौडचे मध्ये नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. या एकात्मता दौडला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडला प्रारंभ केला. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समत्वयक संजय माटे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे व शासकिय अधिकारी पोलिस विभागाचे अधिकारी , विद्यार्थी , खेळाडू उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता राखण्याचे महत्वपुर्ण काम केले. आज त्यांच्या नावाने संपूर्ण देशभर एकात्मता दौड आयोजित केली जात आहे. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित आहे. सर्व वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील. देशाची अखंडता कोणीही दूर करु शकत नाही. अशा प्रकारचा संदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी दिला. तत्पुवी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी यांना एकात्मतेची शपथ दिली .
सदर दौड झाशी राणी चौक – इतवारा चौक- सामान्य रुग्णालय – कच्छी लाईन – निर्मल बेकरी- गोल बाजार – सरदार वल्लभभाई पटेल चौक मार्गे जाऊन पुन्हा जिल्हा क्रिडा संकुल येथे या रॅलीचा समारोप झाला.