चांदुर बाजार येथे सीताफळ ची आवक वाढली-प्रति नग 10 रुपयांची विक्री सुरू, आवक मोठ्या प्रमाणात

0
591
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / बादल डकरे –

सीताफळ म्हटले की थंडीच्या कालावधी मधील सर्वात स्वादिष्ट फळ.चांदुर बाजार तालुक्यातील अनेक ग्रामीण भागाला नदीचा पात्राचा किनारा लागला असल्याने सर्वात जास्त सीताफळ त्या भागात घेतले जातात..
दरवर्षी प्रमाणे च या वर्षी सीताफळ हे चागल्या भावाने विक्री होत असल्याने शेतकरी याना अल्प स आनंद झाला आहे.सीताफळ म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणार फळ आहे.मागील वर्षी सीताफळ यांची आवक फार कमी होती कारण सीताफळ या झाडावरील फुलाची संख्या हे जळत होती त्यामुळे फळ तयारच झाले नाही.मात्र या वर्षी पूरक वातावरण निर्माण झाल्याने सीताफळ याची चांदुर बाजार च्या मार्केट मध्ये ही आवक तर वाढली त्याचप्रमाणे देउरवाड़ा या भागातील सर्वात जास्त सीताफळ मिळून येतात.शेतकरी बांधव तसेच लहान मोठे व्यापारी याची विक्री जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सुद्धा करीत आहे.उत्तम गुणवत्ता असल्याने सीताफळ मार्केट मध्ये आले की लवकर विक्री होत आहे तसेच सीताफळ उत्पादक शेतकरी याना थंडीच्या दिवसात सुगीचे दिवस आले असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.वाढलेल्या आवक मुले चांदुर बाजार तालुका वासी तसेच पाहुणे सीताफळ विषयी आपली ईच्छा पूर्ण करणार हे मात्र नक्कीच.