हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांचा आरोप असलेल्या एस्.डी.पी.आय.च्या दबावाला बळी पडून श्री सिद्धलिंग स्वामीजी यांना अटक करणे, हा कर्नाटक राज्य सरकारच्या हिंदुद्वेषाची परिसीमा ! – हिंदु जनजागृती समिती

0
1075
Google search engine
Google search engine

या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘‘पोलिसांनी ३० ऑक्टोबरला जेवर्गी येथे एस्.डी.पी.आय. संघटनेच्या दबावाला बळी पडून जेवर्गी तालुक्यातील आंदोला येथील करुणेश्‍वर मठाचे मठाधीपती श्री सिद्धलिंग स्वामीजी यांना अटक करणे, हा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या हिंदुद्वेषाची परिसीमा आहे. या घटनेचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. राज्यात पी.ए.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. या संघटनांच्या कार्यकर्त्यांवर राज्यातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांचा आरोप आहे. पोलिसांच्या आरोपपत्रातही या संघटनांच्या नावाचा उल्लेख आहे. असे असतांना पोलीस एस्.डी.पी.आय. आणि पी.ए.एफ्.आय. या संघटनांच्या पदाधिकार्‍यांना अटक करण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ? राज्य सरकारही हिंदु संतांना त्रास देत आहे. सरकारने तत्परतेने श्री सिद्धलिंग स्वामीजी यांना मुक्त करावे, अशी आमची मागणी आहे.’’