मंत्रालयातील डिजीटल दलाल कोण ? – नवाब मलिक

0
1222
Google search engine
Google search engine

भाजप आता लाचार होऊन गप्प बसणार की सेनेला उत्तर देणार…

 

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – मंत्रालयात निर्माण करण्यात आलेल्या डिजीटल दलालांच्या माध्यमातून जनतेचा पैसा लुटण्याचं काम सुरु करण्यात आले असून भाजप सरकारने ही भ्रष्टाचाराची नवीन पध्दत सुरु केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची अंमलबजावणी करताना डिजीटल कंत्राट देण्यात आले. मात्र कर्जमाफीसाठी डिजीटल कंत्राट देताना निविदा काढली होती का? मर्जीतल्या कंपनीला कंत्राट मिळवून देणारे कौस्तुभ धवसे कोण ? त्यांची नेमणूक दलालीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आली का ? याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी, असा आरोप नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

या राज्यात सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १४४ ओएसडींची नेमणूक केली. यात निधी कामदार, दुसरा डिजीटल दलाल म्हणजे कौस्तुभ धवसे आहे. आयटी क्षेत्रात पैसे कसे खायचे हा उदयोग यांनी सुरु केला आहे. बिगर सरकारी कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज आरोप केला की, डिजीटल यंत्रणेत घोटाळा असल्यामुळेच कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही. डिजीटल दलाल कौस्तुभ धवसे यांनी यांच्या ओळखीच्या कंपनीला ठेका दिला आहे. डिजीटल दलालाच्या माध्यमातूनच हा ठेका देण्यात आला आहे. सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रक काढून एक बैठक आयोजित केली आहे. गेली चार महिने अधिकाऱ्यांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांबाबत  हे पत्रक आहे. नाशिक मधील सहकार विभागाचे असिस्टंट रजिस्टार रफिकलाल अहिरे यांचा  मृत्यू झाला. तर दुसरे अधिकारी विठ्ठल खंडागळे कोमात गेले आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते दबावाखाली होते, असे त्यांचे कुटुंबीय सांगत आहेत. १८-१८ तास काम करुनही समाधान मिळत नसल्यामुळे अधिकारी तणावग्रस्त झाले आहेत. आता अधिकाऱ्यांची संघटना राज्यव्यापी बैठक घेवून यावर निर्णय घेणार आहे. डिजीटल कारभारामुळेच हे अधिकारी तणावात गेले आहेत. कौस्तुभ धवसे यांनी डिजीटल घोळ केल्यामुळेच हे अधिकारी बळी पडले आहेत, असा आरोप यावेळी नवाब मलिक यांनी केला. पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी शिवसेनेने प्रसिध्द केलेल्या भाजपच्या भ्रष्टाचारी मंत्र्याची पुस्तिकेवर भाष्य केले. या पुस्तिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या चारित्र्यावर संशय निर्माण केला आहे. अमित शाह यांच्यावर पाच पाने लिहिली आहेत.  त्या पुस्तिकेमध्ये लिंक दिल्या आहेत. त्या पाहिल्यावर काही गंभीर खुलासे समोर आले आहेत. शिवसेना सत्तेला चिटकून बसण्यासाठी लाचार बनताना पाहिले होते. आता शिवसेनेने भाजपवर अतिशय गंभीर टीका केली आहे. भाजप लाचार बनून ही टीका सहन करणार की सेनेला चोख उत्तर देणार, हे पाहावे लागेल. जर भाजप गप्प राहिली तर ती लाचार आहे, हे सिद्ध होईल. असेही नवाब मलिक म्हणाले. खिचडी हे सर्वसामान्य आणि आजारी लोकांचे खाद्य आहे. खिचडीला प्रमोट करायचे असेल आणि खिचडीला राष्ट्रीय भोजनाचा दर्जा दयायचा असेल तर खिचडीला जीएसटी मुक्त केले पाहीजे अशी मागणी नवाब मलिक यांनी खिचडी विषयावर बोलताना केली. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो उपस्थित होते.