श्री मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केल्यानं पत्रकारावर गुन्हा

0
1414
Google search engine
Google search engine

मेरठ |

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर केल्यानं आता एका स्थानिक पत्रकारावर गुन्हा दाखल झालाय. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी अच्छे दिनच्या प्रश्नावर मेंढ्यांच्या कळपाला उत्तर देताना दाखवले आहेत.

पत्रकार अफगाण सोनी यांनी मोदींचा खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केल्यानं बदनामी आणि सायबर क्राईम या अंतर्गत गुन्हा  दाखल करण्यात आलाय.

मी चुकून तो व्हिडीओ शेअर केलाय, सोशल मीडियावर अनेकजण अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करतात, मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही,  असं अफगाण सोनी यांचं म्हणणं आहे.