‘सातबारा आपल्या दारी’ उपक्रम

0
1021
Google search engine
Google search engine



महेंद्र महाजन जैन / रिसोड 



Add caption



वाशिम, – जिल्ह्यातील खातेधाराकांच्या संगणकीकृत सातबारामधील काही प्रमाणत शिल्लक असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी  ‘सातबारा आपल्या दारी’ उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या चावडी वाचन मोहिमेंतर्गत हा उपक्रम राबविला जात असून प्रत्येक खातेधारकाला संगणकीकृत सातबाराची प्रत घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दि. १५ मे ते १५ जून २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित गावांचे तलाठी संगणकीकृत सातबाराचे चावडी वाचन करतील. यामध्ये ज्या सातबारामध्ये त्रुटी आढळून येथील त्यांची दुरुस्ती संबंधित तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे.

ग्रामसभेमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तालुकास्तरीय एक नोडल अधिकारी चावडी वाचनाकरिता उपस्थित राहणार आहे. ग्रामसभेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. तरी सर्व खातेधारकांनी जागृत राहून आपला संगणकीकृत सातबारामध्ये असलेल्या चुकांची दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालायामार्फत करण्यात आले आहे.