मुंगळा येथे महिलांचा रस्त्यासाठी टाहो

0
573
Google search engine
Google search engine

वाशिम


महेंद्र महाजन जैन  /  रिसोड 

वाशिम जिल्ह्यातील मुंगळा येथील दलित वस्ती लगत जिल्हा परिषद निधीतून कळमेश्वर ते मुंगळा पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे 21 लाख रुपये मंजुरात निधी आहे पुलालगत विहीर असून पूल झाल्यामुळे दलित वस्तीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने महिला ,पुरुष ,वृद्धासह बाल गोपालांना पाणी भरताना पुलावरून उड्या मारत पाणी भरावे लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आहे पूल झाल्याबरोबर कंत्राटदाराने पुलालगत मोठे पाईप टाकून रस्ता तयार करून देणे अपेक्षित असताना कामाला विलंब होत असल्याने वृद्धाला सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे आम्ही दलित असल्याने लोक प्रतिनिधी आमच्याकडे  हेतुपुरस्कार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे याबाबत कंत्राटदारांशी ते बाहेरगावी असल्याने  भ्रमण ध्वनिवरून  संपर्क साधला असता काम अजून पूर्ण झाले नसून लवकरच पुलालगत पाईप टाकून रस्ता तयार करणार असल्याची माहिती त्यांनी  दिली दलित महिलांनी मात्र रस्त्यासाठी आर्त टाहो फोडला आहे