कन्हैया कुमारची सभा होऊ देणार नाही ! – कोल्हापूरच्या हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

0
682
Google search engine
Google search engine

कोल्हापू –

 

कन्हैया कुमार याची ८ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे सभा होत आहे. ही सभा होऊ न देण्याचा निर्धार विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ३ नोव्हेंबर या दिवशी मिरजकर तिकटी येथे हिंदु एकता संघटनेच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सभा न होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

या वेळी हिंदु एकता संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बराले, शहराध्यक्ष श्री. जयदीप शेळके, श्री. शिवाजीराव ससे, विश्‍व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष श्री. अशोक रामचंदानी, अधिवक्ता श्री. वंदूरकर-जोशी, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, हिंदु महासभेच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णा पवार, शहराध्यक्ष श्री. मनोहर सोरप, धर्मप्रेमी श्री. विक्रम धर्माधिकारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.