कर्नाटकमधील करुणेश्‍वर मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी यांना जामीन संमत

0
541
Google search engine
Google search engine

जेवर्गी (कलबुर्गी) – एका मुसलमान युवकावर आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित केल्याच्या कथित आरोपावरून अटक करण्यात आलेले जेवर्गी तालुक्यातील आंदोला येथील करुणेश्‍वर मठाचे मठाधीपती श्री सिद्धलिंगस्वामीजी यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ४ नोव्हेंबर या दिवशी जामीन संमत केला. वरील कथित आरोपाखाली कर्नाटक पोलिसांनी श्री सिद्धलिंगस्वामीजी यांना ३० ऑक्टोबरला रात्री अटक केली होती. श्री सिद्धलिंगस्वामीजी हे श्रीराम सेनेचे राज्य कार्याध्यक्षही आहेत.