मोर्शी तालुक्यातील  बळीराजा शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत ! – तालुक्यातील फक्त 23 शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट मंजूर

0
1471
Google search engine
Google search engine

*३२८५७ शेतकऱ्यांनी भरले ऑन लाईन कर्जमाफीचे अर्ज !*

रुपेश वाळके – मोर्शी –

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना दीड लाख रुपया पर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यामुळे बळीराजा शेतकरी खुप खुष झाला होता. परंतु कर्जमाफीची घोषणा होऊन तीन महीण्याचा कालवधी उलटला तरी अद्यापही मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले नसल्याने शेतकरी आजही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

मोर्शी तालुक्यात आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी आॅनलाइन सुविधा केंद्रांवर शेतकऱ्यांना सहपरिवार दिवस-रात्र रांगेत उभे राहावे लागले. सर्व्हर डाऊन, मशीनचा बिघाड इत्यादी तांत्रिक अडचणीमुळे वेगवेगळ्या अर्ज भरणा केंद्रावर चकरा माराव्या लागल्या. या कालावधीत शासनाच्या शेती व शेतकरी विषयक कोणत्याच महत्त्वाकांक्षी योजना, अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी दिली जात असल्याचा गाजावाजा करून, शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची धूंद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यामुळे कर्जमाफीच्या धावपळीतच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागल्याने, शेती व शेतकरी विषयक इतर योजना, अनुदान उपलब्धीकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा मिळाली नाही आणि कोणतेच अनुदानही मिळाले नसल्याचा आरोप मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

मोर्शी तालुक्यातील शेतकरी गत तीन वर्षापासून दुष्काळ, नापिकी, सावकारी पिळवणूकीच्या ओझ्याने हलाखिचे जीवन जगत असलेला शेतकरी यंदा शेतमालाला उत्पादन काढण्यापुरतेही भाव न मिळाल्याने, शेतकरी डबघाईस आला. आर्थिक टंचाईमुळे अस्तित्वाची लढाई शेतकरी कुटुंब लढत आहेत. या लढाईत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या करून त्यांचे जीवन संपविले. शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला शासनाचे धोरण पूर्णतः कारणीभूत असल्याचे मोर्शी तालुक्यातील शेतकरी बोलून दाखवत आहे .

राज्यशासनातर्फे दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची घोषना करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्याला अजून एक रुपयाही मिळाला नाही. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असे सांगितले , परंतु दिवाळी होऊन बरेच दिवस ऊलटले तरी अद्याप शेतकऱ्यांची दिवळी गोड झाली नसल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नावाने कर्जमाफी जाहीर केली. यात देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी म्हणून मोठ्या घुमधडाक्याने प्रचार सुद्धा करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या जिव्हाची लाही करून रात्रंदिवस जागून मोर्शी तालुक्यातील ६७ गावातील ३२८५७ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी चे ऑन लाईन अर्ज भरले कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन अर्ज केल्यानंतर चावळी वाचन घेण्यात आले. *तरीही मोर्शी तालुक्यात फक्त २३ खातेदारांची ग्रीन लिस्ट शासनाकडून २७ आक्टोबर ला मंजूर झाली आहे त्यामध्ये ११ कुटुंब व १ सिंगल शेतकरी कर्ज माफी साठी पात्र ठरले आहे . त्यातही फक्त ५ शेतकाऱ्यांच्याच खात्यात पैसे जमा झाले असून १८ शेतकरी अजूनही कर्ज माफीच्या प्रतीक्षेत आहे .कर्ज माफीची घोषणा ऐकून मोर्शी तालुुुक्यातील शेतकरी खुश झाला होता मात्र यासाठी अनेक दिवसाचा कालावधी उलटल्याने कर्ज माफी होणार की नाही ही चिंता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे.