*कर्ज माफी तर सोडाच भाजपावाले आले अरेरावीवर, याकरीताच दिले काय बहुमत अशा तिव्र शब्दात शिवसेनेने केला निषेध दानवे पाटलांचा*

0
654
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले – 


महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कर्ज बाजारी मुळे बेहाल झालेला आहे.कंटाळून आत्महत्या करीत आहे त्यांना सांत्वना देण्याएेवजी शिव्या देऊन भाजपचे नेते त्यांना अपमानीत करीत आहेत या गोष्टीचा शिवसेनेने तीव्र निषेध नोंदवला.
    संपूर्ण महाराष्ट्रात शेतक-यांचे कर्ज माफी बद्दल सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत त्यामध्ये सत्तेत असले तरी शेतक-यांचे हिताकरीता शिवसेना सुध्दा रस्त्यावर उतरून सरकारला कर्ज माफी करण्यासाठी विनंती करीत आहे.कर्ज माफी तर सोडाच उलट सरकार आल्यापासून भाजपचे नेते अरेरावीवर उतरतांना दिसत आहेत.    शेतक-यांचे सांत्वन करण्यापेक्षा त्यांना ऊलट शिव्या देत आहेत हा या राज्याच्या केवळ शेतक-यांचा अपमान नसून समस्त महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे व हा आम्ही कदापिही सहन करणार नाही अशा तिव्र शब्दात आज स्थानीक जयस्तंभ चौक परतवाडा येथे नरेंद्र पडोळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख ,आशिष सहारे विधानसभा संघटक,किशोर कासार परतवाडा शहर प्रमुख,विनय चतुर अचलपूर शहर प्रमुख यांचे नेतृत्वाखाली जाहीर निषेध नोंदवला.भाजपा चे खासदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी शेतक-यांना उद्देशून *एक लाख टन तूर खरेदी करूनही रडतात साले* असे अव्वाच्य शब्दात वक्तव्य करून राष्ट्राच्या पोशींद्याचा अर्थात बळीराजाचा अपमान केला.यातून स्पष्ट होते की यांना सत्तेचा माज आला आहे अशा शब्दात किशोर कासार परतवाडा शहर प्रमुख,विनय चतुर अचलपूर शहर प्रमुख,आशिष सहारे विधानसभा संघटक,चेतन जवंजाळ उपतालूका प्रमुख,नंदकिशोर काळे उपतालूका प्रमुख,नगरसेवक नरेंद्र फीसके,गोवर्धन मेहरे,कुलदिप काळपांडे,ओमप्रकाश दिक्षीत,राज पाटील यांनी निषेध नोंदवला याप्रसंगी सागर वाटाणे,बंडू घोम,अनिल तायडे,कैलाश कलाने,माणिक देशपांडे,गजू हिवराळे,प्रवीण लाडोळे,बंडू काटे,सुधिर देशमुख,मुरली नंदवंशी व शेकडो कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते दानवे यांचे फोटोवर चप्पल उगारून त्यांनी आपले शब्द परत घ्यावा,तसेच शेतक-यांचा मान राखून जाहिर माफी मागावी,सरकारने त्वरित कर्ज माफी जाहिर करावी,तूर खरेदी सुरू ठेवावी व अशा उद्दाम नेत्यांना भाजपाने आवर घालावा अन्यथा याही पेक्षा तिव्र आंदोलन करून महाराष्ट्राची जनता असंतोषाला उत्तर देईल असा इशारा सुध्दा देण्यात आला