पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या – आरोपी शिक्षक पतीची कबुली

0
829
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे/ शहेजाद खान –

काल ८ नोव्हेंबरला नांदगाव खंडेश्वर जवळ येणस शिवारात चांदूर रेल्वे येथील
शिक्षिका सौ.कविता किर्तीराज इंगोले(वय ४०) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत
मिळाल्याने नांदगाव खंडेश्चर सह चांदूर रेल्वे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
त्या शिक्षिकेची हत्या कोणी केली याचे गुढ कायम होते. नांदगाव खंडेश्वर पोलीसांनी
कालच त्या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून शिक्षिकेचे पती किर्तीराज इंगोले
(वय ४५) याला ताब्यात घेतले. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला संपविल्याचे त्याने
कबुली दिली.आज (ता.९) नांदगाव पोलीसांनी आरोपी किर्तीराज इंगोले याला दुपारी
न्यायालयात हजर केले. न्यायालयाने किर्तीराज इंगोले याला १३ नोव्हेंबर पर्यंत
पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांदगाव पोलीसाकडून प्राप्त माहितीनुसार काल मृतक कविता इंगोलेच्या भाऊ
गजानन कटकतलवारे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. त्यावरून
पोलीसांनी किर्तीराजवर हत्येचा गुन्हा दाखल केला. कविताचा पती किर्तीराज इंगोले
हे शिक्षक असुन पत्नी कविताच्या चारित्र्यावर संशय होता.त्यामूळे मागील एक
महिण्यापासून दोघांमध्ये कलह  सुरू होता.त्यामूळे कविता हे मागील एक
महिण्यापासुन तिचे माहेरी नांदगाव खंडेश्वर येथे राहत होती व तेथून ती रोज चांदूर
रेल्वे ला एस.टी.बसने ये-जा करीत होती. कविता इंगोले हिने ३० आक्टोबरला कुटूंबीक
हिंसेच्या अंतर्गत स्थानिक न्यायालयात केस दाखल केली होती. त्या संदर्भात तीने
मंगळवारी (ता.७) सकाळी ९ वाजता स्थानिक वकिलाची भेट घेऊन चर्चा केली आणि
वकिलाची फी देऊन त्या शाळेला गेल्या. सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर त्या
चांदूर रेल्वे बस स्टेशनला गेल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले. दुसऱ्या  दिवशी
कविताचे प्रेतच नांदगाव खंडेश्वर रस्त्यावर येणस येथे सापडले होते. चारित्र्यांच्या
संशयामूळे पत्नीला संपविल्याची स्पष्ट कबुली शिक्षक किर्तीराज इंगोले यांनी
पोलीसांना दिली. आज दुपारी पोलीसांनी त्याला नांदगावच्या न्यायालयात हजर
केले. न्यायाधिशांनी त्याला १३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.