*रायपूरा वासीयांना मिळत आहे असे पिण्याचे पाणी* *होळी पासून असलेले लीकेज दुरुस्तीचे प्रतिक्षेत*

0
1281
Google search engine
Google search engine
अचलपूर /श्री प्रमोद नैकेले /-

अचलपूर नगरपालिका म्हणा की त्यांचा एखादा विभाग सर्वच कसे एकसमान त्यात निश्चिंत नगरसेवक मग काय जनतेचे होणारच हाल.
   अचलपूर नगरपालिका किंवा त्यांचा कोणताही विभाग पाहीला तर गलथान कारभाराची जणू यांची परंपरा बनलेली आहे.स्वच्छता जवळपास नगरपालिका प्रशासनाला माहितच नाही.शहरातील कित्येक भागात नालीसफाई,घणकचरा उचलण्याची प्रक्रिया जवळ पास नसल्यातच जमा आहे.घंटागाड्यातर हद्दपार झाल्या आहेत.याकडे प्रशासन तर सोडाच स्थानीक नगरसेवकही मुंग गिळून बसले आहेत तक्रार केल्यास त्यावर काही कार्यवाही होईलच हे काही निश्चित सांगता येत नाही काही नगरसेवक सोडले तर बरेचशे नगरसेवक केवळ नगरसेवकच बनुन बसले असल्याचे दिसत आहे.आजपर्यंत एकही नगरसेवक प्रभागात  फीरकलेला नाही.यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.अशीच एक गंभीर समस्या रायपूरा येथील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत आहे.येथील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेला पाणीपुरवठा करण्यात आलेल्या पाणीपुरवठा जोडणीच्या ठिकाणी होळी पासून लिकेज झालेले आहे यामधून कित्येक लिटर पाणी रस्त्यावर वाहत असून विनाकारण पाण्याचा अपव्यय होत आहे.या लिकेजच्या जागेवर पाणी साचून डबके निर्माण झाले आहे व या डबक्यात वराह बसतात व हे पाणी पितात यामुळे त्यांचे मुखातील व शरीरावरील घाण या पाण्यात मिसळून परिसरातील लोकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे.याबाबत येथील काही नागरिकांनी नगरसेवकांना तक्रारी सुध्दा केल्या पण केवळ उडवाउडवीची उत्तरे देवून नागरिकांच्या आयुष्यासोबत जीवघेणा खेळ खेळल्या जात आहे यावर त्वरित उपाय करावा अशी जनतेची मागणी असून अदृश्य झालेले सफाई कामगार,घंटागाड्या,घणकचरा संकलन वाहने व सफाई कामगांरांचे वार्ड जमदार संबधित परिसरातील सफाई करतात की नाही याची चौकशी व्हावी अशीच मागणी जनतेची आहे.