*औरंगाबाद जिल्ह्यामधील दहा हजार संस्था ( ट्रस्ट ) ची नोंदणी रद्द.*

0
1618
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त, मुंबई यांचे आदेशाने सर्व नोंदणी कृत सार्वजनिक न्यास ( PUBLIC TRUST ) ज्यांनी नोंदणी पासून त्यांच्या न्यासाचे हिशोब पत्रके (ऑडीट रिपोर्ट) व बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) कार्यालयात सादर केलेले नाहीत, तसेच ज्या संस्था नमूद उद्देशावर कार्य करत नाहीत, अशा सर्व संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त, मुंबई यांनी २ महिन्यापूर्वी दिलेले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्या मधील धर्मादाय कार्यालयांनी अकार्यक्षम व अकार्यरत असणार्या संस्थांची यादी तयार केली असून ती यादी महाराष्ट्र शासनच्या, धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://charity.maharashtra.gov.in/mr-in/ जिल्हा निहाय प्रसिध्द केलेली असून, सदरील संस्थांची नोंद रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

तरी मराठवाडा धर्मादाय वकील संघा तर्फे सर्व संस्थांच्या विश्वस्तांना आवाहन करण्यात येते आहे कि, महाराष्ट्र शासनच्या, धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळास https://charity.maharashtra.gov.in/mr-in/ भेट देऊन आपल्या संस्थेचे नाव या यादीत समाविष्ट असल्यास त्वरित धर्मादाय कार्यालय येथे भेट देऊन योग्य ती पूर्तता व दंड भरून नोंदणी रद्द होणार नाही याची दक्षता घ्यावी.