नियमित टोमॅटो खा आणि मिळवा अनेक आजारांपासून सुटका ! हृदयरोग्यांसाठी उत्तम

0
904
Google search engine
Google search engine

टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने दृष्टीदोषांच्या विकारावरही टोमॅटो फायदेशीर आहे.
लालबुंद, रसरसीत टोमॅटो हे मूळचं अमेरिकेतलं फळं. आपल्याकडे खाण्यात त्याचा सर्रास वापर केला जातो. टोमॅटोशिवाय भाजीच्या रस्स्याला चव नाही, त्यामुळे या फळाचा मोठ्या प्रमाणात वापर आपल्याकडे होतो. भाजी, सूप, कोशिंबीर, केचअप अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टॉमेटोचा वापर केला जातो. टॉमेटोमध्ये लोह, फॉस्फरस ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. टोमॅटो हा मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी उत्तम मानला जातो. टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी मात्र टोमॅटो खाणं टाळावं.


‘हे’ पदार्थ कच्चे खाल्ल्यास लाभदायक
टोमॅटो खाण्याचे फायदे
– रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, मधुमेह असे त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आहारात टॉमेटोचा समावेश आवर्जून करावा.
– वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते, त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
– टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने दृष्टीदोषांच्या विकारावरही टोमॅटो फायदेशीर आहे.
– ज्यांना अ‍ॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता आहे त्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.
– मलावरोधाचा त्रास असल्याने टोमॅटोचे नियमित सेवन करावे
– लहान मुलांना पिकलेल्या टोमॅटोचा रस दिल्याने त्यांची तब्येत चांगली सुधारते.