*युवा गौरव पुरस्कार पत्रकार शेख इम्रान यांना जाहीर*

0
490
Google search engine
Google search engine

बुलढाणा / विशेष प्रतिनिधी –

युवा शक्ती पत्रकार संघ व साप्ताहिक औरंगाबाद युवा यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा युवा गौरव पुरस्कार या वर्षी मोताळा तालुक्यातील कोथळी येथील *पत्रकार शेख इम्रान शेख उस्मान* यांना जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असुन त्यांना हा पुरस्कार औरंगाबाद येथे एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते दिनांक 17 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाटयगृह येथे दिला जाणार आहे
शेख इम्रान यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे शेख इम्रान यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक विषयावर प्रकाशझोत टाकला.
शेख इम्रान हे सामजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्याना भारत सरकार च्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतगत नेहरू युवा केंद्र च्या माध्यमातून जिल्हा युवा पुरस्कार देऊन सुद्धा गौरवन्यात आले आहे त्यांना याअगोदर आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे
सदर पुरस्कार युवाशक्ती पत्रकार संघ चे अध्यक्ष तथा साप्ताहिक औरंगाबाद युवा चे संपादक अब्दुल कय्युम; सय्यद साबेर भाई, अलिम बेग, प्रवीण बुरांडे,शेख हमिद, हसन शाह, हफिज अली, संजय हिंगोलीकर, अब्दुल मुजाहेद, संजय पवार, मुख्तार खान, संचालक मंडळ यांनी एका पत्रकान्वे हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कळविले आहे
सदर पुरस्कार शेख इम्रान यांना जाहीर होताच त्यांचे पत्रकार मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.